शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

तुरुंगवासात असलेल्या आसाराम बापूची प्रकृती बिघडली, अतिदक्षता विभागात उपचार सुरू

By बाळकृष्ण परब | Published: February 17, 2021 7:45 AM

Asaram Bapu Health Update : प्रकृती बिघडल्याने तुरुंगात असलेल्या आसारामला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर आसारामला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले

जयपूर - राजस्थानमधील जोधपूर येथील कारागृहात तुरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्याला येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरुंगात असलेल्या आसारामला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर आसारामला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. अल्पवयीन मुलींच्या केलेल्या लैंगिक शोषणाप्रकरणी आसाराम बापू आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहे.मंगळवारी रात्री आसाराम बापूची तब्येत अचानक बिघडली. अस्वस्थ वाटू लागल्याने सुरुवातीचा तासभर कारागृहातील दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे आसाराम याने गुडघ्याचा त्रास होत असल्याचे तसेच रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे तसेच अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले.

आसाराम बापूला जेव्हा रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याचे काही भक्तही तिथे पोहोचले. त्यांना पोलिसांनी बाहेर काढले. आसारामला संपूर्ण वेळ एक्स-रे रूममध्ये ठेवण्यात आले. तिथे त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्याशिवाय कार्डिओलॉजीच्या डॉक्टरांनाही बोलावण्यात आले. त्याशिवाय कार्डिओलॉजी डॉक्टरलाही बोलावण्यात आले. दरम्यान, आसारामची ईसीजी रिपोर्ट सामान्य आला आहे.वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर आसारामची रवानगी महात्मा गांधी रुग्णालयातून मथुरादास माथूर रुग्णालयातील सीसीयू वॉर्डमध्ये करण्यात आली. आसाराम आजारी पडल्याचे समजताच त्याचे भक्तही मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमा झाले. 

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापूjailतुरुंगRajasthanराजस्थान