ओवेसी होतायेत सोशल मिडियावर ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 12:15 IST2019-11-16T12:15:04+5:302019-11-16T12:15:48+5:30
सकाळ पासून ओवैसी_भारत_छोड़ो हे हॅशटॅग 10 हजारपेक्षा अधिकवेळा वापरले गेले आहे.

ओवेसी होतायेत सोशल मिडियावर ट्रोल
मुंबई : अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी असमाधान व्यक्त केले होते. त्यांनतर त्यांनी आता 'मला माझी मशीद पुन्हा हवी आहे', असे ट्विट केले आहे. त्यामुळे त्याच्या या ट्विटमुळे असदुद्दीन ओवेसी हे सोशल मिडियावर ट्रोल होत आहे. त्यांच्याविरुद्ध ट्विटरवर हॅशटॅग ओवैसी_भारत_छोड़ो ट्रेंड सुरु आहे.
अयोध्या जमीन वादावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने ऐतिहासिक निकाल देत अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामजन्मभूमी न्यासाला देण्याचा व मशिदीसाठी अन्यत्र ५ एकर जागा देण्याचा आदेश दिला असताना त्यावर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप घेतला होता. तर मशिदीसाठी पाच एकर जमिनीची ऑफर नाकारली पाहिजे हे माझं वैयक्तिक मत असल्याचं सुद्धा ते म्हणाले होते.
त्यांनतर शुक्रवारी त्यांनी याप्रकरणी पुन्हा एक ट्विट केले आहे. ज्यात 'मला माझी मशीद पुन्हा हवी आहे' असे ओवेसी म्हणतायत. मात्र या ट्विटनंतर त्यांना सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे. सकाळ पासून ओवैसी_भारत_छोड़ो हे हॅशटॅग 10 हजारपेक्षा अधिकवेळा वापरले गेले आहे.
I support this.#ओवैसी_भारत_छोड़ो
— Dinesh Yadav (@DineshY39888224) November 16, 2019
जिसे सुप्रीम कोर्ट को नही मानना वो भारत से जा सकता है।#ओवैसी_भारत_छोड़ोpic.twitter.com/3MURKyNFbl
— गोविंद हिन्दू (@govindhindu56) November 16, 2019