देशात मुस्लीम भाडेकरू नव्हे तर वाटेकरी : असदुद्दीन ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 15:24 IST2019-06-01T15:05:23+5:302019-06-01T15:24:06+5:30
ओवेसी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०० जागा जिंकल्या असल्याने, मनमानी करू असे मोदींना वाटत असेल, तर तसे होणार नाही.

देशात मुस्लीम भाडेकरू नव्हे तर वाटेकरी : असदुद्दीन ओवेसी
हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ऐतिहासिक कामगिरी करताना स्वबळावर सरकार स्थापन केले. त्यांनतर राजकीय वर्तुळातून विवध प्रतिकिया येत आहे. यावरून, एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर टीका केली आहे. मुस्लीम समाजाला देशात बरोबरीचे हक्क आहेत. भाडेकरू नाही, वाटेकरी म्हणून राहणार आहोत असे ओवेसी म्हणाले. हैदराबाद येथील मक्का मस्जिद येथे एका सभेला ते संबोधित करत होते.
ओवेसी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०० जागा जिंकल्या असल्याने, मनमानी करू असे मोदींना वाटत असेल, तर तसे होणार नाही. मुस्लीम समाजाला धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार संविधानाने दिले आहे. जर मोदी हे मंदिरमध्ये जाऊ शकतात तर मुस्लीम व्यक्ती ही मस्जिदमध्ये जाऊ शकतात असे, ओवेसी म्हणाले. भारतातील मुस्लीम देशाचा भाडेकरू नाही, वाटेकरी म्हणून राहणार आहेत असे ओवेसी म्हणाले
Asaduddin Owaisi, AIMIM: Hindustan ko aabad rakhna hai, hum Hindustan ko aabad rakhenge. Ham yahan par barabar ke shehri hain, kirayedaar nahi hain hissedar rahenge. https://t.co/kiu7wFIx59
— ANI (@ANI) June 1, 2019
हिंदूस्थानला सुरक्षित ठेवायचे आहे. आम्ही हिंदूस्थानला सुरक्षित राखू. आमचा पक्ष दलित- मुस्लीम आणि वंचितांच्या हक्कासाठी लढाई कायम ठेवू असे, ओवेसी म्हणाले. दलित आणि मुस्लीम समाज एक झाल्याने औरंगाबादमधील लोकसभा निवडणुकीत एमआयएमला विजय मिळवता आला असल्याचे ही ओवेसी म्हणाले.