शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

लोकसंख्या नव्हे, तर बेरोजगारी देशाची खरी समस्या, ओवैसींचा भागवतांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 8:53 AM

देशातली खरी समस्या लोकसंख्या नाही, तर बेरोजगारी असल्याचं ओवैसी म्हणाले आहेत.

ठळक मुद्देदेशातली खरी समस्या लोकसंख्या नाही, तर बेरोजगारी असल्याचं ओवैसी म्हणाले आहेत.   संघाचे मोहन भागवत दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीच्या कायद्यावर बोलत आहेत. आतापर्यंत किती जणांना नोकरी दिली तेसुद्धा सांगा. वर्षं 2018मध्ये सरासरी 36 मुलांनी दररोज आत्महत्या केली आहे.

नवी दिल्लीः सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केल्यानंतर त्यांच्यावर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसींनी पलटवार केला. देशातली खरी समस्या लोकसंख्या नाही, तर बेरोजगारी असल्याचं ओवैसी म्हणाले आहेत.  संघाचे मोहन भागवत दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीच्या कायद्यावर बोलत आहेत. आतापर्यंत किती जणांना नोकरी दिली तेसुद्धा सांगा. वर्षं 2018मध्ये सरासरी 36 मुलांनी दररोज आत्महत्या केली आहे. त्यावर तुमचं मत काय?, असा प्रतिप्रश्नही ओवैसींनी भागवतांना विचारला. भारतात 60 टक्के लोकसंख्या ही 40 वर्षांहून कमी वयाच्या मुलांची आहे. त्यावर तुम्ही बोलत का नाही, असं म्हणत ओवैसींनी भागवतांवर टीकास्त्र सोडलं आहे. मुरादाबादमध्ये मोहन भागवत यांनी बंद दाराआड झालेल्या एका चर्चेत देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणला पाहिजे, असं म्हटलं आहे. तसेच 'लवकरच एका भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर संघ राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल. सध्या देशातील वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय आहे, त्यासाठी दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा. लोकसंख्या नियंत्रणात येईल,' असं भागवत यांनी चर्चेदरम्यान म्हटलं आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीने टीका केली. जबरदस्तीने नसबंदी करणार का? असं सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. डाव्या विचारसरणीच्या पक्षांकडून नेहमीच भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानात बदल करण्याचे आरोप केले जातात. सोशल मीडियावर सध्या मोहन भागवत भारताचे नवीन संविधान बनवत असल्याची एक पीडीएफ फाईल व्हायरल होऊ लागली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. भागवत नवीन भारतीय संविधान बनवत असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आहे. त्याची एक पीडीएफ फाईल बनवून व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवण्यात येत आहे. या पीडीएफ फाईलच्या मुखपृष्ठावर सरसंघचालकांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीMohan Bhagwatमोहन भागवत