शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

चोरट्यांनी सुटे भाग करून विकली केजरीवाल यांची कार? पोलीस पथकाकडून कसून तपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 15:07 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली वॅगन आर कार  चोरट्यांनी सुटे भाग करून विकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली वॅगन आर कार  चोरट्यांनी सुटे भाग करून विकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केजरीवाल यांच्या चोरीस गेलेल्या कारचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक मीरत येथे गेले असून, चोरीच्या गाड्यांचे सुटे भाग करून विकण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या सोतीगंज बाजारात पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. मीरत येथील सोतीगंज बाजार चोरीच्या वाहनांची विक्री आणि सुटे भाग करून विकण्यासाठी बदनाम आहे. या बाजारात दिल्ली आणि एनसीआर भागातून चोरीस गेलेल्या गाड्या विक्रीस आणल्या जातात. केजरीवाल यांच्या गाडीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सोतीगंजच्या बाजारात रस्त्यापासून गोदामांपर्यंत तपास केला.  तसेच वेगन आर गाड्यांची थांबवून थांबवून चौकशी केली.   नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खासगी गाडी गुरुवारी दुपारी चोरीला गेली होती. नवी दिल्लीतील सेक्रेटेरियटजवळून चोरांनी त्यांच्या गाडीवर हात साफ केला. माध्यमांच्या मिळालेल्या वृत्तानुसार, अरविंद केजरीवाल यांच्याजवळ असलेली निळ्या रंगाची वॅगन-आर (Wagon R) गाडी चोरीला गेली. नवी दिल्लीच्या पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळाले. पण त्यामध्ये चोरीचे दृश्य व्यवस्थित दिसत नसल्याचे सांगण्यात येत आहे.दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारण्यापूर्वी अरविंद केजरीवाल या गाडीचा वापर करत होते. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनावेळी केजरीवाल यांनी या गाडीचा सर्वाधिक वापर केला होता. सध्या ते सरकारी गाडीचा वापर करत आहेत.  परदेशी राहणाऱ्या भारतीयाकडून ही कार केजरीवालांना भेट मिळाली होती. व्हीआयपी कल्चरचा विरोध म्हणून  आम आदमी पक्षाने या निळ्या व्हॅगन आरचा प्रतिकात्मक वापर केला होता. दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे केंद्राचं ध्यान कुठे आहे? हे ट्वीट केजरीवालांनी रीट्वीट केलं आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना ही कार चोरीला गेल्याने हा दिल्ली पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcarकारCrimeगुन्हाPoliceपोलिसNew Delhiनवी दिल्ली