शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

स्वरा भास्करला अटक करा, हिंदुत्व दहशतवादावरील ट्विटनंतर अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 12:23 PM

आम्ही हिंदुत्वात दहशतवादासोबत ठीक असूच शकत नाही आणि आम्ही तालिबानी आतंकी हल्ल्याने तुटलो असून आम्हाला मानसिक धक्का बसला आहे. आम्ही तालिबानच्या दहशवादाने शांत राहू शकत नाही,

ठळक मुद्देनेटीझन्से स्वराला चांगलेच फैलावर घेतले असून भादंविच्या कलम 295 ए अन्वये धार्मिक भावनांना ठेस पोहोविण्याप्रकरणी स्वराला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे ट्विट एका युजर्सने केले आहे.

नवी दिल्ली - तालिबानने ज्या पद्धतीने काबुलवर आक्रमण करुन राष्ट्रपती भवन ताब्यात घेतलं. संपूर्ण अफगाणिस्तानवर आपली सत्ता काबिज केल्याचंही जाहीर केलं. त्यावरुन, जगभरात खळबळ उडाली आहे. त्यातच, जवळपास 5 देशांनी तालिबानी सरकारला समर्थन केलं असून भारताच्या सीमारेषेवरील चीन, बांग्लादेश आणि पाकिस्तानचा यात समावेश आहे. त्यामुळे, भारतासोबत तालिबाचे संबंध कसे असतील, यावर चर्चा झडत आहेत. त्यातच, अनेक भारतीय सेलिब्रिटीही आपलं मत व्यक्त करत आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 

स्वरा भास्कर ट्विटरवरील आपल्या कमेंटमुळे सातत्याने चर्चेत असते. अनेकदा नेटीझन्सकडून तिला ट्रोलही करण्यात येते. तर, अनेकजण तिच्या विचारांचे, विधानांचे समर्थनही करतात. नुकतेच स्वराने अफगाणिस्तानमधील घडामोडींवर भाष्य करताना, तालिबानी दहशतवाद्यांची तुलना हिंदुत्ववाद्यांशी केली आहे. त्यानंतर, सोशल मीडियावर स्वराला ट्रोल करण्यात येत आहे. स्वरा भास्करला अटक करण्याची मागणीही नेटीझन्सने केली आहे. ट्विटरवर #ArrestSwaraBhaskar हा ट्रेंड सुरू झाला आहे. 

आम्ही हिंदुत्वात दहशतवादासोबत ठीक असूच शकत नाही आणि आम्ही तालिबानी आतंकी हल्ल्याने तुटलो असून आम्हाला मानसिक धक्का बसला आहे. आम्ही तालिबानच्या दहशवादाने शांत राहू शकत नाही, आणि आम्ही सर्वच हिंदू्त्वाच्या दहशतावादाने नाराज आहोत. आमचे मानवी आणि नैतिक मूल्य हे पीडित किंवा उत्पीडीतच्या ओळखीवर अवलंबून आहे, असे ट्विट स्वराने केले आहे. स्वराने आपल्या ट्विटमध्ये हिंदुत्वाची तुलना तालिबानी दहशवादाशी केल्याने नेटीझन्स चांगलेच खवळले आहेत.  नेटीझन्से स्वराला चांगलेच फैलावर घेतले असून भादंविच्या कलम 295 ए अन्वये धार्मिक भावनांना ठेस पोहोविण्याप्रकरणी स्वराला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे ट्विट एका युजर्सने केले आहे. यामध्ये 3 वर्षांपर्यंत कारावाची शिक्षा आहे, असेही त्यानी म्हटले आहे.       

टॅग्स :Swara Bhaskarस्वरा भास्करHindutvaहिंदुत्वAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानTwitterट्विटर