शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

जम्मू आणि काश्मीर: लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला; तीन जवान शहीद, तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 7:19 PM

जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील थानामंडी परिसरात दोन लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला.

पूंछ : जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील राजौरी सेक्टरमधील थानामंडी परिसरात दोन लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला. ज्यात तीन जवान शहीन झाले असून तीन जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनीही तत्काळ प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तर देताना लष्कराच्या तीन जवानांना प्राण गमवावे लागले. काल संध्याकाळपासून या भागात असलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराची लढाई सुरू आहे. सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४८ राष्ट्रीय रायफल्सच्या परिसरात ही कारवाई सुरू आहे. 

अतिरिक्त फौजफाटा दाखल माहितीनुसार, घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला असून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू असून वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे काल रात्री एक डीकेजी येथे संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. आज संध्याकाळी संपर्क झाला ज्यानंतर समोरून हल्ला करण्यात आला, ज्याला प्रत्युत्तर देताना तीन जवानांना प्राण गमवावे लागले. 

कसा झाला हल्ला?एक जिप्सी आणि एक मिनी ट्रक अशी दोन लष्कराची वाहने सुरनकोट येथील बुफलियाज येथून राजौरीतील थानमंडीकडे जात होती. येथे ४८ राष्ट्रीय रायफल्सचे मुख्यालय आहे. टोपा पीरच्या खाली वाहने येताच दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. डीकेजी आणि बुफलियाज दरम्यानचा भाग राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. इथे खूप घनदाट जंगल असल्याने दहशतवाद्यांनी फायदा घेत इथेच हल्ला केला, अशी माहिती 'इंडियन एक्सप्रेस' या वृत्तसंस्थेने दिली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानMartyrशहीदterroristदहशतवादी