The army is ready to respond to any action in Ladakh by china pnm | चीनविरुद्ध भारताचं ‘पंच’तंत्र सज्ज; लडाख सीमेवर ड्रगनला चोख उत्तर देण्याची लष्कराची तयारी

चीनविरुद्ध भारताचं ‘पंच’तंत्र सज्ज; लडाख सीमेवर ड्रगनला चोख उत्तर देण्याची लष्कराची तयारी

ठळक मुद्देलडाखमध्ये भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने, अनेक चकमकी सुरुचीफ ऑफ डिफेंस स्‍टाफ जनरल यांनी तिन्ही सैन्य प्रमुखांसह संरक्षणमंत्र्यांची भेट घेतलीचीनची सीमेवर बांधकाम थांबवण्याची अट भारताने फेटाळली

नवी दिल्ली - पूर्व लडाख सीमेवर आक्रमक वृत्ती दाखवणाऱ्या चीनला योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पूर्ण तयारी केली आहे. मुत्सद्देगिरीबरोबरच चीनविरूद्ध रणनीती आखली जात आहे. भारत आणि चिनी सैन्यामधील वाढत्या तणावाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देशाच्या सुरक्षा चक्रातील 'टॉप 5' शी संवाद साधला. यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्य प्रमुखांशी बैठक झाली.

सैन्यात कमांडर्सची बैठक वर्षामध्ये दोनदा होते. यामध्ये सैन्याच्या सात कमांडचे अधिकारी सहभागी होतात. चीनला लागून असलेल्या उत्तर आणि पूर्वेकडील कमांडचे सैन्य अधिकारीही या परिषदेचा भाग आहेत. अशा परिस्थितीत आक्रमक पवित्रा घेणाऱ्या चीनविरूद्ध रणनीती ठरविली जाईल, असा विश्वास आहे. यामध्ये सादरीकरणाच्या माध्यमातून सर्व सैन्य अधिकारी सीमेची परिस्थिती दाखवतीलआणि भारतीय सैनिकांनी उचललेल्या पाऊलांची माहिती देतील.

पंतप्रधान मोदींसमवेत सीडीएस, एनएसए आणि लष्कर प्रमुखांच्या बैठकीचा अजेंडा सैनिकी सुधारणेवर आणि भारताची लढाऊ क्षमता वाढविण्यावर होता. पण चीनच्या लडाखमधील करकुतीने बैठकीचा विषय बदलला. अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना लडाखच्या ताज्या परिस्थितीची माहिती करून दिली. सीमेवर सुरू असलेली विकासकामे थांबणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. चीनने बांधकाम थांबवण्याची अट घातली आहे जी भारत स्वीकारण्यास तयार नाही. सीमेवर विकासकामे सुरुच ठेवण्याचा निर्धार भारताने स्पष्ट केला आहे.

सीडीएसने तीन सैन्य प्रमुखांसह प्रथम संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली. पांगोंग लेक, गॅल्वान व्हॅली, डेमचोक आणि दौलाब बेग ओल्डीमध्ये भारतीय आणि चिनी सैन्याशी चकमक झाली आहे. अजित डोवाल यांनी एल.ए.सी. मधील घडामोडींवर सातत्याने देखरेख ठेवली आहे. रिपोर्ट्सनुसार, डोवाल यांनी पंतप्रधान मोदींना उत्तर सिक्कीम आणि उत्तराखंडमधील सीमेवर पूर्वी झालेल्या काही हालचालींबद्दलही सांगितले आहे.

भारतीय लष्कराने लडाखच्या सीमेवर अनेक क्षेत्रात संख्या वाढविली आहे जेणेकरुन चीन कोणतीही उलटसुलट कारवाई करू शकत नाही. चीनने एलएसीवर अतिशय वेगाने बांधकाम सुरू केले आहे आणि तंबू बांधले आहेत. भारतानेही पांगोंग तलाव आणि गॅल्वान व्हॅलीमध्ये अशाच प्रकारे चीनला उत्तर दिलं आहे. दौलट बेग ओल्डी येथे लष्कराची ८१ व ११४ वा ब्रिगेड तैनात आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची तातडीची बैठक

बोटांच्या लांबीने कळेल तुम्हाला कोरोनामुळे मृत्यूचा धोका किती?; वैज्ञानिकांनी सांगितलं...

कोरोनाशी लढण्यासाठी वैज्ञानिकांचा नवा शोध; ‘या’ औषधाचा एक डोस रुग्णांना देणार ताकद!

रेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार; ३० तासांच्या प्रवासाला लागले तब्बल ४ दिवस, मजूर हैराण

हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; दुपारी १ ते ५ दरम्यान घराबाहेर पडणं टाळा अन्यथा...

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The army is ready to respond to any action in Ladakh by china pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.