Lockdown: रेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार; ३० तासांच्या प्रवासाला लागले तब्बल ४ दिवस, मजूर हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 08:47 AM2020-05-27T08:47:35+5:302020-05-27T08:49:02+5:30

अलीकडेच रेल्वेच्या या ट्रेनने ३० तासांचा प्रवास करण्यासाठी तब्बल ४ दिवस लावले. त्यामुळे ४ दिवसांपासून भूक, पाणी आणि गरमीने मजूर आणखी हैराण झाले.

Lockdown: 30-hour journey took 4 days by Shramik Train, labor harassment pnm | Lockdown: रेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार; ३० तासांच्या प्रवासाला लागले तब्बल ४ दिवस, मजूर हैराण

Lockdown: रेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार; ३० तासांच्या प्रवासाला लागले तब्बल ४ दिवस, मजूर हैराण

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवासासाठी केवळ ३० तास लागत असताना रेल्वेचा ४ दिवसांचा प्रवास आश्चर्य व्यक्त करणारा आहे.रेल्वेच्या अशा अनागोंदी कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागला४ दिवसांच्या प्रवासात तहान-भूकेने आणि गरमीने मजूर झाले हैराण

समस्तीपूर – लॉकडाऊन काळात अडकलेल्या शेकडो प्रवासी मजुरांना आपापल्या राज्यात पोहचवण्यासाठी रेल्वेकडून विशेष श्रमिक ट्रेन सुरु आहेत. मात्र या ट्रेनबाबत अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत. रेल्वेच्या या भोंगळ कारभाराचा मजुरांना फटका बसत आहे. यातील काही ट्रेन्स उशिराने आपल्या निर्धारित स्टेशनवर पोहचत आहेत.

अलीकडेच रेल्वेच्या या ट्रेनने ३० तासांचा प्रवास करण्यासाठी तब्बल ४ दिवस लावले. त्यामुळे ४ दिवसांपासून भूक, पाणी आणि गरमीने मजूर आणखी हैराण झाले. काही ठिकाणी मजुरांनी रेल्वे प्रशासनाविरोधात गोंधळही केला. दिल्लीपासून बिहारच्या मोतिहारी येथे जाणारी ट्रेन ४ दिवसानंतर समस्तीपूर येथे पोहचली. या प्रवासासाठी केवळ ३० तास लागत असताना रेल्वेचा ४ दिवसांचा प्रवास आश्चर्य व्यक्त करणारा आहे.

मजुरांचं म्हणणं आहे की, त्यांना मोतिहारीचं तिकिट दिलं होतं. ही ट्रेन गेल्या ४ दिवसांपासून आम्हाला फिरवत आहे. अडचणीच्या काळात घरी पोहचणाऱ्या मजुरांना रेल्वेच्या अशा अनागोंदी कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ट्रेनमध्ये एक गरोदर महिला होती. तिला प्रसुतीवेदना सुरु झाल्यानंतर ट्रेनमधून उतरवण्यात आलं. मेडिकल सुविधेविना या महिलेने प्लॅटफॉर्मवरच मुलीला जन्म दिला. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी या महिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

समस्तीपूरला पोहचणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की,२२ तारखेपासून आमचा प्रवास सुरु झाला. या ४ दिवसात भूकेने, तहान लागलेल्याने आणि गरमीने मजूर हैराण झाले. मात्र ट्रॅक खाली नसल्याने मार्ग बदलला जात आहे, या मजुरांना खाण्या-पिण्याची सोय करता येईल असं रेल्वे प्रशासनाने सांगितले.

३६ तासाच्या प्रवासाला ७० तास

समस्तीपूर पोहचलेल्या आणखी एका ट्रेनमधील प्रवासाने पुण्याहून ट्रेन पकडली होती, २२ तारखेला ही ट्रेन निघाली. छत्तीसगड, ओडिसा, पश्चिम बंगाल मार्ग करत २५ मे रोजी ही ट्रेन दुपारी समस्तीपूर येथे पोहचली. या प्रवासाला ३६ तास लागतात तिथे ७० तासानंतर संपूर्ण भारताची सैर करुन समस्तीपूरला आणलं असं प्रवासी धर्मेंद्र यांनी सांगितले.

Web Title: Lockdown: 30-hour journey took 4 days by Shramik Train, labor harassment pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.