शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लष्करप्रमुखपदी लेफ्ट. जनरल सुहागच

By admin | Updated: June 11, 2014 23:26 IST

लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग यांची पुढले लष्करप्रमुख म्हणून नियुक्तीच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग यांची पुढले लष्करप्रमुख म्हणून नियुक्तीच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही, असे सांगून संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांनी दलबीरसिंग सुहाग यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. संसदेत आज लष्कर उपप्रमुख आणि पुढले लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग यांच्याविषयी माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने व्ही. के. सिंग यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली. सैन्य दलाशी संबंधित मुद्दे राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. असे मुद्दे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चर्चेला यायला नकोत, असे संरक्षणमंत्री अरुण जेटली राज्यसभेत म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना लोकसभेत काँग्रेसचे उपनेते अमरिंदरसिंग आणि राज्यसभेत काँग्रेसचे उपनेता आनंद शर्मा यांनी व्ही.के. सिंग यांनी आज लेफ्टनंट जनरल सुहाग यांच्याबाबत केलेला टिष्ट्वट आपत्तीजनक असल्याचे सांगून व्ही.के. सिंग यांना मंत्रिमंडळातून त्वरित बडतर्फ करण्याची मागणी केली. सरकार व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्याची दखल घेईल आणि त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून बडतर्फ करेल, असा विश्वास आपल्याला आहे, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)