भारत-पाक सीमेवर लष्कर, बीएसएफला रेड अलर्टचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 02:08 AM2019-09-27T02:08:55+5:302019-09-27T06:54:47+5:30

लष्कर व बीएसएफला रेड अलर्टचा इशारा

Army, BSF red alert alert on Indo-Pak border | भारत-पाक सीमेवर लष्कर, बीएसएफला रेड अलर्टचा इशारा

भारत-पाक सीमेवर लष्कर, बीएसएफला रेड अलर्टचा इशारा

Next

जम्मू : चिनी बनावटीच्या ड्रोनद्वारे पाकिस्ताननेभारतातील पंजाबमध्ये रायफली व दारुगोळा पाठवल्याचे उघड झाल्यानंतर भारत-पाक सीमेवर लष्कर व बीएसएफला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

काश्मीरमध्ये पाकिस्तान हवाई घुसखोरी करण्याची शक्यता असल्याने आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जम्मू, सांबा, राजौरी, पुंछ, बारामुल्ला आदी भागांमध्ये लष्करी जवानांना अतिदक्ष राहाण्यास सांगण्यात आले आहे. ड्रोनच्या सहाय्याने भारतात शस्त्रे व दारुगोळा पाठविणे ही पाकिस्तानची नवी चाल आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांना ही शस्त्रे पाठविण्यात येणार होती.

Web Title: Army, BSF red alert alert on Indo-Pak border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.