शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘अरिहंत’च्या यशाने त्रिविध संरक्षणसिद्धता, आण्विक पाणबुडीचे मोदींकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 06:03 IST

पूर्णपणे देशी बनावटीच्या ‘आयएनएस अरिहंत’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रधारी आण्विक पाणबुडीने देशाच्या सागरी हद्दीत जरब बसविण्यासाठी पहिली गस्ती सफर यशस्वी केल्याने भारताची त्रिविध आण्विक संरक्षणसिद्धता सोमवारी जगजाहीर झाली.

नवी दिल्ली : पूर्णपणे देशी बनावटीच्या ‘आयएनएस अरिहंत’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रधारी आण्विक पाणबुडीने देशाच्या सागरी हद्दीत जरब बसविण्यासाठी पहिली गस्ती सफर यशस्वी केल्याने भारताची त्रिविध आण्विक संरक्षणसिद्धता सोमवारी जगजाहीर झाली. यामुळे भारताकडे शत्रूच्या लक्ष्यावर जमीन, आकाश आणि पाण्याखालूनही अण्वस्त्रांचा अचूक मारा करण्याची सज्जता पूर्ण झाली आहे.पहिल्या गस्ती सफरीवरून परतलेल्या ‘अरिहंत’च्या अधिकाऱ्यांचे आणि नाविकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत औपचारिक स्वागत केले. ‘अरिहंत’च्या यशाने भारताची त्रिविध अण्वस्त्रसिद्धता पूर्ण झाल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आणि या यशाबद्दल नौदलाच्या व वैज्ञानिकांच्या पाठीवर शाबासकीची थापदिली. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या एका निवेदनानुसार मोदींनी संपूर्ण देशासाठी ही एक फार मोठी कामगिरी असल्याचे नमूद केले आणि ‘आयएनएस अरिहंत’ आपल्या नावाप्रमाणे देशाच्या १३० कोटी नागरिकांचे बाह्य धोक्यांपासून संरक्षण करून भारतासभोवतालच्या क्षेत्रात शांततेचे वातावरण सुनिश्चित करण्यात मोठे योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला.सैन्यदलांचे शौर्य आणि वैज्ञानिकांचे बुद्धिकौशल्य यांचे कौतुक करताना मोदी यांनी म्हटले की, यांच्या अथक परिश्रमामुळे अणुचाचणीतून संपादित केलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करून देशाच्या संरक्षणासाठी अण्वस्त्रसिद्धतेचे त्रिकूट साध्य करणे शक्य झाले आहे. या यशाने भारताची क्षमता व ती सिद्ध करण्यातील निर्धार याविषयीच्या शंकांचेही ठामपणे निरसन झाले आहे.‘अरिहंत’ नौदलात दाखल झाल्याचे याआधी कधीही अधिकृतपणे जाहीर केले गेले नव्हते. या पाणबुडीचे जलावतरण सन २००९ मध्ये तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केले होते. तेव्हापासून असंख्य नानाविध चाचण्या यशस्वी झाल्यावर ती आॅगस्ट २०१६ मध्ये नौदलात दाखल झाली. ‘अरिहंत’ ८३ मेवॅ क्षमतेच्या अणुभट्टीवर चालते व ती अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे.‘अरिहंत’चे महत्त्वअण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे म्हणजेच त्यांचा फक्त बचावासाठी वापर करण्याचे भारताचे धोरण आहे. त्यादृष्टीने प्रतिहल्ल्याचे साधन म्हणून ‘अरिहंत’ अधिक परिणामकारक ठरेल.कारण जमीन आणि हवेतून सोडता येणारी अण्वस्त्रे शत्रूला हुडकून काढणे तुलनेने सोपे आहे; परंतु कोणताही आवाज न करता पाण्याखाली वावरणारी पाणबुडी हे गनिमीअस्त्र आहे. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndiaभारत