दिवाळीत हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमध्ये वाद, एकमेकांवर रॉकेटद्वारे केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 00:24 IST2023-11-15T00:23:03+5:302023-11-15T00:24:13+5:30

Student: कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या किरकोळ वादांचं रूपांतर हाणामारीमध्ये होत असतं. असाच प्रकार दिवाळीमध्ये दिसून आला. हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर एकमेकांवर फटाक्यांच्या मदतीने हल्ला केला.

Argument among students in hostel during Diwali, attack each other with rockets | दिवाळीत हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमध्ये वाद, एकमेकांवर रॉकेटद्वारे केला हल्ला

दिवाळीत हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमध्ये वाद, एकमेकांवर रॉकेटद्वारे केला हल्ला

कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या किरकोळ वादांचं रूपांतर हाणामारीमध्ये होत असतं. असाच प्रकार दिवाळीमध्ये दिसून आला. हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर एकमेकांवर फटाक्यांच्या मदतीने हल्ला केला. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विद्यार्थी एकमेकांच्या हॉस्टेलच्या इमारतींवर रॉकेटच्या मदतीने हल्ला करताना दिसत आहेत. त्यामुळे एखाद्या रणभूमीसारखं चित्र दिसत होतं. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या एक्सवर एका अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवादरम्यान फटाक्यांच्या माध्यमातून हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा झाला, असं या व्हिडीओखाली लिहिण्यात आलं आहे.

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेलं नाही. रविवार १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन साजरं झालं होतं. त्यामुळे हा व्हिडीओ गेल्या दोन तीन दिवसांतीलच असावा, असा अंदाज आहे. दरम्यान, ही घटना आयआयटी कोट्टायम येथील असल्याचे सांगण्यात आले. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून, त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.  

Web Title: Argument among students in hostel during Diwali, attack each other with rockets