तिरंदाजी

By Admin | Updated: July 30, 2015 23:14 IST2015-07-30T23:14:07+5:302015-07-30T23:14:07+5:30

रजत विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

Archery | तिरंदाजी

तिरंदाजी

त विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत
कोपेनहेगेन : रजत चव्हाणने विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिपच्या कंपाऊंड गटात आज अंतिम फेरीत स्थान मिळवताना भारतासाठी पदक निश्चित केले तर लक्ष्मीराणी माझी महिलांच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये कांस्य पदकासाठी प्ले-ऑफमध्ये खेळणार आहे.
रजतने कोलंबियाच्या कॅमिलो कारडोनाचा १४३-१३८ ने पराभव केला. त्याला अंतिम फेरीत स्थानिक खेळाडू स्टीफन हेनसनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अंतिम लढत शनिवारी होणार आहे. लक्ष्मीराणीने भारताला आणखी एक पदक मिळवून देण्याच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. महिला विभागात रिकर्व्ह इव्हेंटमध्ये ती वैयक्तिक गटात कांस्य पदकासाठी प्ले-ऑफ लढतीमध्ये खेळणार आहे. प्ले-ऑफमध्ये तिला कोरियाच्या मिसुन चोईच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीत माजी नंबर वन खेळाडू दीपिका कुमारीचे आव्हान पहिल्याच दिवशी संपुष्टात आल्यानंतर लक्ष्मीराणीने भारताच्या आशा कायम राखल्या. तिने चौथ्या फेरीत जॉर्जियाच्या ख्रिस्टिन सेबुआचा पराभव केला तर उपांत्यपूर्व फेरीत मेक्सिकोच्या अलेजांद्रा वेलेंसियावर ९-८ ने सरशी साधली. अव्वल मानांकित तैपेईच्या शी चिया लिनने लक्ष्मीराणीचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. तिला उपांत्य फेरीच्या संघर्षपूर्ण लढतीत ६-४ ने पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)

Web Title: Archery