म्यानमारच्या पाच जणांना अटक, सोन्याची 218 बिस्कीटे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 21:13 IST2018-08-01T21:11:46+5:302018-08-01T21:13:44+5:30
म्यानमार येथील पाच जणांना आसाम रायफलच्या बटालियनने अटक केली आहे. या पाच जणांकडून तब्बल 218 सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत.

म्यानमारच्या पाच जणांना अटक, सोन्याची 218 बिस्कीटे जप्त
मिझोरम - म्यानमार येथील पाच जणांना आसाम रायफलच्या बटालियनने अटक केली आहे. या पाच जणांकडून तब्बल 218 सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. या सर्व सोन्याचे वजन 36.16 किलोग्रॅम एवढे असून बाजारात त्याची किंमत अंदाजे 11 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते.
आसाम रायफल बटालियनच्या सेक्टर 23 येथील पोलीस प्रमुखांनी म्यानमारच्या पाच नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्यात येत होती. हे सोने भारतीय बाजारात विकण्यात येणार होते, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र, तत्पूर्वीच आसाम रायफल बटालियनच्या जवानांनी या नागरिकांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून 36.11 किलो वजनाचे अंदाजे 11 कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे.
Mizoram: Serchhip Battalion of Assam Rifles under 23 Sector of Inspector General Assam Rifles (EAST) apprehended 5 Myanmar nationals with 218 gold bars weighing 36.316 Kgs worth over Rs 11 Crore, in Champhai. pic.twitter.com/W833cyHUsY
— ANI (@ANI) August 1, 2018