'पीके' चित्रपटाच्या पोस्टरविरोधात न्यायालयात याचिका दाखल

By Admin | Updated: August 2, 2014 18:01 IST2014-08-02T12:05:13+5:302014-08-02T18:01:38+5:30

अभिनेता आमिर खानच्या 'पीके' या चित्रपटाच्या पोस्टरविरोधात एका वकिलाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Appeal filed in court against 'PK' poster | 'पीके' चित्रपटाच्या पोस्टरविरोधात न्यायालयात याचिका दाखल

'पीके' चित्रपटाच्या पोस्टरविरोधात न्यायालयात याचिका दाखल

>ऑनलाइन टीम
कानपूर, दि. २ - अभिनेता आमिर खानच्या 'पीके' या चित्रपटाच्या पोस्टरविरोधात एका वकिलाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गुरूवारी आमिर खानच्या 'पीके' चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले, ज्यामध्ये आमिर संपूर्ण निर्वस्त्र अवस्थेत दिसत असून त्याच्या हातात फक्त एक टेपरेकॉर्डर दिसत आहे. त्याच्या या पोस्टरमुळे अनेकांना धक्का बसला असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शुक्रवारी काही वृत्तपत्रांमध्येही हे पोस्टर प्रसिद्ध झाले होते. 
या पोस्टरमुळे समाजात अश्लिलता व लैंगिक अत्याचारांचे प्रमाण वाढेल, असे या वकिलाने याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणावर ७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
राजकुमार हिरानीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात आमिरशिवाय अनुष्का शर्मा व सुशांतसिंग राजपूत यांचीही प्रमुख भूमिका आहे. १९ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
 

Web Title: Appeal filed in court against 'PK' poster