कामधेनू दत्तक ग्राम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
घाटनांद्रा : जिल्हा परिषदेच्या कामधेनू दत्तक ग्राम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन धारला येथील कार्यक्रमात जि. प. सदस्य कौतिकराव मोरे यांनी केले.
कामधेनू दत्तक ग्राम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
घाटनांद्रा : जिल्हा परिषदेच्या कामधेनू दत्तक ग्राम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन धारला येथील कार्यक्रमात जि. प. सदस्य कौतिकराव मोरे यांनी केले.धारला येथे पशुवैद्यकीय दवाखाना, घाटनांद्रा यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या योजनेत शेतकर्यांना यशवंत, गवत, शाळू, ज्वारीचे बियाणे उपलब्ध केले असून, जनावरांना होणारे गोचीड व गोमाशी या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येणार असून, या मेळाव्यात सहभागी झालेल्या गुरांना लसीकरण करण्यात आले.यावेळी डॉ. सरपताते, डॉ. गवंडर, धारल्याचे सरपंच चंद्रशेखर शिरसाठ, घाटनांद्र्याचे जोशी, डॉ. धनंजय महाजन, कौतिकराव मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात पं. स. सदस्य रफिकमिया देशमुख, शिवनाथ चौधरी, कामधेनू दत्तक योजनेच्या अध्यक्ष निखत मुश्ताक देशमुख, उपाध्यक्ष तुकाराम ताठे, तुकाराम ठोके, सांडूअप्पा कोठाळे यांची उपस्थिती होती. संचलन व आभार डॉ. धनंजय महाजन यांनी मानले. नबाब तडवी, मगरे, शिंदे यांनी परिश्रम घेतलेे.