शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

स्टारसाठी नेमणार दुसरा ऑपरेटर ....जोड आहे...

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

गडकरींचे निर्देश : बायोडिझेल, इथेनॉलचा पर्यायनागपूर : शहरातील प्रवाशांना चागंली सेवा देण्यात अपयश ठरलेल्या वंश निमय इन्फाप्रोजेक्ट लिमिटेड (व्हीएनआयएल) च्या कामकाजावर नाराजी व्यक्त करून स्टार बससाठी नवीन ऑपरेटर नियुक्त करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले.गडकरी यांनी शहरातील विकास प्रकल्पांचा रविभवन येथे आढावा घेतला. ...


गडकरींचे निर्देश : बायोडिझेल, इथेनॉलचा पर्याय
नागपूर : शहरातील प्रवाशांना चागंली सेवा देण्यात अपयश ठरलेल्या वंश निमय इन्फाप्रोजेक्ट लिमिटेड (व्हीएनआयएल) च्या कामकाजावर नाराजी व्यक्त करून स्टार बससाठी नवीन ऑपरेटर नियुक्त करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले.
गडकरी यांनी शहरातील विकास प्रकल्पांचा रविभवन येथे आढावा घेतला. महापौर प्रवीण दटके यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, सभापती रमेश सिंगारे, गिरीश देशमुख, गोपाल बोहरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
महापालिका व व्हीएनआयएल यांच्यातील आर्थिक वाद निकाली काढण्यासाठी आर्बिट्रेटर नियुक्त करावा. नवीन करारात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नये यासाठी कायदे तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, सोबतच करारात डिझेल सोबतच बायोडिझेल, इथेनॉल व वीज याचा समावेश करावा. नवीन ऑपरेटरची नियुक्ती होईपर्यत याच कंपनीकडे स्टार बसची जबाबदारी कायम ठेवावी असे निर्देश गडकरी यांनी दिले.
स्टार बस, पेंच टप्प -४, २४ बाय ७, नागनदी शुद्धीकरण, सिवरेज प्रकल्प, बाजार, क्रीडा संकुल तसेच खासगी सहभागातील सुरू असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पाबाबत अधिकारी व कंत्राटदार यांच्याशी चर्चा करण्यात आली. पेंच टप्पा ४ हा १५ मार्चपर्यत पूर्ण होईल. तसेच ३१ मार्चपर्यंत शहरातील नवीन २० जलकुं भांचे काम पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती प्रवीण दटके यांनी दिली.
जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या २४ बाय ७ योजनेंतर्गत घरोघरी मीटर बसविण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. प्रस्तावित तीन सिव्हरेज प्रकल्प अहवालांचा आढावा घेण्यात आला. रखडलेल्या सिमंेट रस्त्यांच्या कामाला तातडीने सुरुवात होणार आहे. यासाठी कंत्राटदाराला अडीच कोटी देण्यात येणार असल्याची माहिती दटके यांनी दिली.(प्रतिनिधी)