शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

कोरोनावर आणखी एक औषध; ‘डीआरडीओ’ने बनविलेल्या औषधाच्या आपत्कालीन वापरास मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 1:29 AM

या औषधाच्या आजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. देशभरात अकरा रुग्णालयांमध्ये ११० कोरोना रुग्णांवर या औषधाच्या दुसºया फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. ज्यांनी हे औषध घेतले नव्हते त्यांच्यापेक्षा ज्यांनी हे औषध घेतले होते ते अडीच दिवस आधीच बरे झाले.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यातच लस, औषधे, ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे. अशा वेळेस डीआरडीओने कोरोनावर बनविलेल्या नव्या औषधाच्या आपत्कालीन वापराला परवानगी देऊन औषध महानियंत्रकांनी सर्वांनाच मोठा दिलासा दिला आहे. २-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) असे नाव असलेल्या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरे होतात तसेच त्यांना बाहेरून द्याव्या लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण खूपच कमी होते. (Another medicine on the corona; Approval for emergency use of medicine manufactured by DRDO)

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डीआरडीओ) इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलायन्स (आयएनएमएएस) व हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) या दोन संस्थांनी संशोधन करून कोरोनावरील नवे औषध बनविले आहे. हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज या औषधाचे उत्पादन करणार आहे.

या औषधाच्या आजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. देशभरात अकरा रुग्णालयांमध्ये ११० कोरोना रुग्णांवर या औषधाच्या दुसºया फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. ज्यांनी हे औषध घेतले नव्हते त्यांच्यापेक्षा ज्यांनी हे औषध घेतले होते ते अडीच दिवस आधीच बरे झाले. या औषधाची मानवी चाचण्यांची तिसरी फेरी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातील २७ रुग्णालयांमध्ये पार पडली. त्यात सहभागी झालेल्यांपैकी ४२ टक्के रुग्णांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होऊन त्यांना बाहेरुन आॅक्सिजनचा पुरवठा करण्याची गरज उरली नाही. तर ज्यांना हे औषध दिले नव्हते त्या रुग्णांपैकी फक्त ३१ टक्के रुग्णांनाच बाहेरून दिलेल्या ऑक्सिजनची गरज उरली नाही. डीआरडीओच्या २-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) या नव्या औषधाने ज्यांची प्रकृतीत मोठी सुधारणा झाली, त्यामध्ये ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची लक्षणीय संख्या आहे.कोरोनाशी मुकाबला करताना भारताने कोवॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसी बनविल्या. आता डीआरडीओने कोरोनावर स्वदेशी बनावटीचे २-डेओक्सी-डी-ग्लुकोज हे नवे औषध बनवून संशोधनातील एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.

असे आहे नव्या औषधाचे स्वरूपडीआरडीओचे २-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) हे कोरोनावरील नवे औषध पावडर स्वरुपात असून रुग्णाने ते पाण्यात मिसळून घ्यायचे आहे.

कोरोनामुळे कोणत्या पेशी बाधित झाल्या आहेत याची ओळख हे औषध पटविते व त्या पेशींचे कार्य सुधारते. रुग्णाच्या प्रतिकारशक्तीत वाढ करून विषाणूला रोखण्याचे काम करते. देशात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना हे गुणकारी औषध त्यांच्यासाठी वरदान ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

४२% रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज नाहीया औषधाची मानवी चाचण्यांची तिसरी फेरी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातील २७ रुग्णालयांमध्ये पार पडली. त्यात सहभागी झालेल्यांपैकी ४२ टक्के रुग्णांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होऊन त्यांना बाहेरुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची गरज उरली नाही.  

टॅग्स :medicineऔषधंcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस