खडसे समर्थकांच्या महाजनांविरोधात घोषणा जवळपास १० मिनिटे गोंधळ

By Admin | Updated: September 24, 2016 00:25 IST2016-09-24T00:25:42+5:302016-09-24T00:25:42+5:30

जळगाव : भाजपातील अंतर्गत कलहाचे पडसाद विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या समोर शुक्रवारी सायंकाळी अजिंठा विश्रामगृहात उमटले. संतप्त खडसे समर्थकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करत त्यांच्या औरंगाबादमधील वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. जवळपास १० मिनिटे हा गोंधळ सुरू होता.यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे म्हणून खडसे समर्थकांनी निवेदनही विधानसभाध्यक्षांना दिले. यावेळी खडसेही विश्रामगृहात उपस्थित होते.

The announcement of the supporters of Khadse Mahajan, about 10 minutes of confusion | खडसे समर्थकांच्या महाजनांविरोधात घोषणा जवळपास १० मिनिटे गोंधळ

खडसे समर्थकांच्या महाजनांविरोधात घोषणा जवळपास १० मिनिटे गोंधळ

गाव : भाजपातील अंतर्गत कलहाचे पडसाद विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या समोर शुक्रवारी सायंकाळी अजिंठा विश्रामगृहात उमटले. संतप्त खडसे समर्थकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करत त्यांच्या औरंगाबादमधील वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. जवळपास १० मिनिटे हा गोंधळ सुरू होता.यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे म्हणून खडसे समर्थकांनी निवेदनही विधानसभाध्यक्षांना दिले. यावेळी खडसेही विश्रामगृहात उपस्थित होते.
औरंगाबाद येथे महाजन यांना खडसेंच्या मंत्रिमंडळातील पत्रकारांनी विचारले असता, खडसेंना मंत्रिपदाबाबत शुभेच्छा देत महाजन यांनी चिमटा काढला होता. खडसेंच्या यापूर्वीच्याऔरंगाबाद दौर्‍यावेळी भाजपाचे कोणी नव्हते असा प्रश्न केला असता ते त्यावेळी त्यांच्या लेवा पाटील समाजाच्या कार्यक्रमास आले होते, असे सांगण्यात आले. महाजनांनी या वक्तव्यावर कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लेवा पाटील समाजाचा उल्लेख करणे चुकीचे होते असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

Web Title: The announcement of the supporters of Khadse Mahajan, about 10 minutes of confusion