जैन डायरीतील भाजप नेत्यांची नावे जाहीर करा - राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 07:02 IST2022-03-29T07:01:52+5:302022-03-29T07:02:22+5:30

शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी

Announce the names of BJP leaders in Jain diary - Raut | जैन डायरीतील भाजप नेत्यांची नावे जाहीर करा - राऊत

जैन डायरीतील भाजप नेत्यांची नावे जाहीर करा - राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी जैन डायरी तसेच बिर्ला डायरी उघड झाली होती. या डायरींमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांची नावे होती. ही नावे जाहीर करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केली.

यशवंत जाधव यांच्या डायरीतील नोंदीवरून केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करीत असल्याचा संदर्भ देऊन खासदार राऊत म्हणाले, जाधव यांची डायरी जर विश्वासार्ह असेल तर  यापूर्वी आलेल्या जैन डायरी व बिर्ला डायरी सुद्धा विश्वासार्ह मानून त्यात नमूद असलेल्या नेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. जैन डायरीच्या वेळी भाजपच्या नेत्यांची नावे उघड झाल्याबरोबर डायरीतील नोंदी विश्वासार्ह नसल्याचे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन केले होते. एका डायरीला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय, ही दुटप्पी भूमिका मान्य नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाहून घेण्याची भाषा करतात. ही पाहून घेण्याची धमकी त्यांनी आम्हाला देऊ नये. ते खोटे पुरावे सादर करून खोट्या केस तयार करीत असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Announce the names of BJP leaders in Jain diary - Raut