Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 19:47 IST2025-08-18T19:37:30+5:302025-08-18T19:47:10+5:30
Who is Amreen Kaur: पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर राजा वीरभद्र सिंह यांचे सुपूत्र आणि हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंह आता अमरीन कौर यांच्यासोबत लग्न करणार आहेत.

Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
Amreen Kaur Vikramaditya Singh Photo: उदयपूरच्या राजघराण्यातील सुदर्शना यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. विक्रमादित्य सिंह अमरीन कौर यांच्यासोबत लग्न करणार आहेत. त्यांची लग्नपत्रिकाही समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह हे राजा वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव आहेत. राजा वीरभद्र सिंह हे सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.
विक्रमादित्य सिंह यांचा २२ सप्टेंबर २०२५ रोजी अमरीन कौर यांच्याशी विवाह होणार आहे. चंदीगढमध्ये हा विवाह सोहळ्या पार पडणार आहे.
कोण आहेत अमरीन कौर?
विक्रमादित्य सिंह यांची होणारी पत्नी अमरीन कौर या प्राध्यापक आहेत. पंजाब विद्यापीठात अमरीन कौर मानसशास्त्र या विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत. अमरीन कौर यांनी हॉर्वर्ड विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलेले आहे.
अमरीन कौर यांच्या वडिलांचे नाव सरदार जोतिंद्र सिंह सेखों आणि आईचे नाव सरदारनी ओपिंद्र कौर असे आहे. अमरीन कौर या चंदीगडमध्ये सेक्टर २ मध्ये राहतात. याच परिसरात हा विवाह होणार आहे.
पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट
मंत्री विक्रमादित्य यांचे यापूर्वी लग्न झाले होते. पहिले लग्न फार काळ टिकले नाही. त्यांचे पहिले लग्न उदयपूरच्या राजघराण्यातील सुदर्शना यांच्यासोबत झाले होते. मेवाड राजघराण्यातील राजकुमारी सुदर्शना सिंह असे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे.
८ मार्च २०१९ मध्ये विक्रमादित्य सिंह यांचा विवाह झाला होता. त्यानंतर चार वर्षातच त्यांच्या संसार मोडला. दोघांनी २०२४ मध्ये घटस्फोट घेतला होता.