शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभच्या प्राप्तिकराची पुन्हा चौकशी

By admin | Updated: May 12, 2016 04:02 IST

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या १५ वर्षांपूर्वीच्या आणि खास करून ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातून मिळालेल्या उत्पन्नावरील प्राप्तिकराच्या आकारणीचे पुनर्निर्धारण करण्याचा

नवी दिल्ली : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या १५ वर्षांपूर्वीच्या आणि खास करून ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातून मिळालेल्या उत्पन्नावरील प्राप्तिकराच्या आकारणीचे पुनर्निर्धारण करण्याचा प्राप्तिकर विभागाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी वैध ठरविला.सन २००१-२००२ या करनिर्धारण वर्षासाठी अमिताभ बच्चन यांना लागू होणाऱ्या प्राप्तिकराचे पुनर्निधारण करण्याचा मुंबईच्या मुख्य प्राप्तिकर आयुक्तांचा मूळ निर्णय आणि त्यानुसार केले गेलेले पुनर्निधारण हे दोन्ही मुंबई उच्च न्यायालयाने दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये रद्द केले होते. त्याविरुद्ध प्राप्तिकर विभागाने केलेली दोन अपिले सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. रंजन गोगोई व न्या. प्रफुल्लचंद्र पंत यांच्या खंडपीठाने मंजूर केली.या पुनर्निर्धारण निर्णयाने अमिताभ यांना त्या वर्षात ‘कौन बनेगा करोडपती’मधून मिळालेल्या ३.१७ कोटींंच्या उत्पन्नावर प्राप्तिकर विभागाने १.६ कोटी रुपयांचा प्राप्तिकर आकारला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने ही कर आकारणी पुनरुज्जीवित झाली. मात्र तो कर अमिताभना भरावाच लागेल, असे नाही. कारण त्याविरुद्ध प्राप्तिकर अपिली आयुक्तांपासून पुन्हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागण्याचा त्यांचा मार्ग मोकळा आहे.