एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:30 IST2025-11-21T14:30:15+5:302025-11-21T14:30:39+5:30
Amit Shah: अमित शाहांनी एसआयआर प्रक्रियेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात दौर्यादरम्यान पुन्हा एकदा घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी निवडणूक आयोगाने राबवलेल्या SIR प्रक्रियेचे समर्थन केले आणि काही राजकीय पक्षांवर घुसखोरांना साथ देण्याचा आरोप केला. हा विषय सध्या अनेक राज्यांमध्ये चर्चेत असून, शाहांच्या वक्तव्याने राजकीय स्तरावर वाद वाढण्याची शक्यता आहे.
भुज येथे बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घुसखोरीला देशाच्या सुरक्षेसाठी आणि लोकशाही व्यवस्थेसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले. त्यांनी काही राजकीय पक्षांवर घुसखोरांना पाठिंबा दिल्याचा आरोप करीत मतदार यादी शुद्धीकरण (SIR) प्रक्रियेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. देशात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेचा उद्देश लोकशाही शुद्ध करणे आणि देश सुरक्षित ठेवणे हा आहे. बिहारच्या जनमताने एसआयआरचा विरोध करणाऱ्या पक्षांना स्पष्ट संदेश दिला आहे. देशातील प्रत्येक घुसखोराला हटवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी पुन्हा व्यक्त केला.
भारत में घुसपैठ को रोकना न केवल देश की सुरक्षा के लिए जरूरी है, बल्कि देश की लोकतांत्रिक व्यवस्था को प्रदूषित होने से बचाने के लिए भी घुसपैठ को रोकना जरूरी है।
— Office of Amit Shah (@AmitShahOffice) November 21, 2025
मगर दुर्भाग्य की बात है, कुछ राजनीतिक दल इन घुसपैठियों को बचाने के लिए यात्रा लेकर निकले हैं, और चुनाव आयोग द्वारा…
शाह यांनी नक्षलवाद संपवण्याबाबत सरकारची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. त्यांनी म्हटले की, काही राजकीय पक्ष घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी रस्त्यावर उतरले आणि आता मतदारयादी दुरुस्तीला विरोध करत आहेत, जे देशाच्या लोकशाहीसाठी हानिकारक आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) हे एकमेव असे बल आहे, जे थल, नभ आणि जल तिन्ही माध्यमांतून देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असते. शाह यांनी नागरिकांना एसआयआर प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले.