शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

"काँग्रेसने अर्थव्यवस्थेचे नुकसान केले, मोदींनी पाचव्या क्रमांकावर आणले", अमित शाहांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 20:03 IST

amit shah : अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोग्य सेवा जागतिक दर्जाच्या बनवण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून काम करत आहेत.

अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीगुजरातमध्ये विरोधी पक्ष काँग्रेसवर सडकून टीका केली. देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केल्याचा आरोप अमित शाह यांनी काँग्रेसवर केला. ते म्हणाले, 'भारत ही जगातील 11वी मोठी अर्थव्यवस्था होती. काँग्रेसने बाराव्या क्रमांकावर आणले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनीच पुन्हा 11 व्या स्थानावर आणले होते. तसेच, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ते पाचव्या क्रमांकावर आणले."

यासोबतच अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोग्य सेवा जागतिक दर्जाच्या बनवण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून काम करत आहेत. ईएसआयसी (ESIC) योजना अधिक उपयुक्त करून त्यांनी देशभरातील कामगारांना सामाजिक सुरक्षा दिली आहे. साणंद येथे 350 खाटांच्या ईएसआयसी रुग्णालयाची पायाभरणी केली. याचा फायदा 12 लाख कामगार आणि परिसरातील रहिवाशांना होणार आहे.

दरम्यान, भाजपच्या गुजरात युनिटचे प्रमुख सीआर पाटील यांनी सोमवारी सांगितले की, यावेळच्या निवडणुका येत्या नोव्हेंबरपर्यंत संपतील. याठिकाणी गेल्या वेळेसारखे होणार नाही. गेल्या वेळी निवडणूक डिसेंबरपर्यंत चालली होती. सीआर पाटील यांनी मात्र हा त्यांचा अंदाज असल्याचे सांगितले. ते कोणत्याही अधिकाऱ्याशी बोलले नाहीत. 

सीआर पाटील यांनी आनंद येथे हे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते दीपक बाबरिया म्हणाले, सीआर पाटील यांच्या वक्तव्यावरून केंद्र सरकार केवळ कमकुवतच नाही, तर निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांवर नियंत्रण आणल्याचे दिसून येते.

आमचा जगातील सर्वात मोठा पक्ष - जेपी नड्डा दुसरीकडे, केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, आमचा एकमेव असा पक्ष आहे, जो जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. आमचा भारतातील एकमेव वैचारिक आधार असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. एकता, विविधतेवर विश्वास ठेवणारा आणि अटल राष्ट्रीय बांधिलकी असलेल्या पक्षात आम्ही आहोत.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाGujaratगुजरात