शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Amit Shah Sansad TV Interview : अमित शाहंनी सांगितली PM मोदींच्या आयुष्यातील तीन महत्वाची आव्हानं, अशी केली मात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 3:58 PM

Amit Shah in Sansad TV Interview : "मोदीजींच्या यशस्वी मुख्यमंत्रीपदाच्या काळात, केवळ गुजरातमध्येच नाही, तर देशभरात आशेचा एक किरण जागृत झाला."

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सत्तेत 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी न्यूज चॅनल संसद टीव्हीला एक खास मुलाखत दिली आहे. यावेळी शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व गुणापासून ते त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांपर्यंत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक आयुष्यातील तीन महत्वाचे आणि तेवढेच आव्हानात्मक टप्पेही सांगितले. (Amit Shah TV interview)

पंतप्रधान मोदींच्या आयुष्यातील तीन महत्वाची आव्हानं -संसद टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा म्हणाले, 'मोदीजींचे सार्वजनिक जीवन तीन भागात विभागले जाऊ शकते. पहिला भाग - भाजपत आल्यानंतर संघटक म्हणून. दुसरा भाग - गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि तिसरा भाग - राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान म्हणून. त्यांनी गुजरातचे संघटन मंत्री म्हणून, एका पक्षाची विश्वासार्हता सामान्य जनतेच्या मनात कशा प्रकारे निर्माण केली जाऊ शकते, याचे उत्कृष्ट उदाहरण स्थापित केले आहे. ते संघटनमंत्री झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच गुजरात भाजपचा प्रवास सुरु झाला. 1990 मध्ये आम्ही युती करून सरकारमध्ये आलो. ती ५० टक्क्यांची भागीदारी होती. मात्र, 1995 मध्ये आम्ही संपूर्ण बहुमताने निवडून आलो आणि तेथून भाजपने आजपर्यंत कधीही मागे वळून पाहिले नाही.

समस्या येतात, त्या भविष्यातही येतील -'मोदीजींच्या यशस्वी मुख्यमंत्रीपदाच्या काळात, केवळ गुजरातमध्येच नाही, तर देशभरात आशेचा एक किरण जागृत झाला, की बहुपक्षीय लोकशाही व्यवस्थेत कोणताही दोष नाही. ती यशस्वी होऊ शकते आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंतही जाऊ शकते. समस्या येतात, त्या भविष्यातही येतील. पण आज मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून, समस्येचे तत्काळ निराकरण केले जाते, त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि संवेदनशीलतेने त्या सोडविल्या जातात, असेही अमित शाह म्हणाले.

नरेंद्र मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात? - पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात? या प्रश्नावर अमित शहा म्हणाले, 'मी त्यांना अगदी जवळून काम करताना पाहिले आहे. हे सर्व लोक जे आरोप करतात, ते पूर्णपणे निराधार आरोप आहेत. मी मोदींसारखा श्रोता पाहिला नाही. कुठलीही बैठक असो, ते किमीत कमी बोलतात, अतिशय संयमाने ऐकतात आणि नंतर योग्य तो निर्णय घेतात. कधी-कधी तर आम्हालाही वाटते, की एवढा विचार सुरू आहे. पण ते प्रत्येकाचे ऐकतात आणि गुणवत्तेच्या आधारावर लहानातल्या लहान व्यक्तीच्या सूचनेलाही महत्त्व देतात. त्यामुळे, ते निर्णय लादणारे नेते आहेत, असे म्हणणे, यात काहीही तथ्य नाही.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातBJPभाजपा