शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा – अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 11:10 AM

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं म्हटलं आहे.  

ठळक मुद्देएअर स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं म्हटलं आहे. 'पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्तक असल्याने सर्जिकल स्ट्राईक होणार नाही असे लोक म्हणत होते'

अहमदाबाद - भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. एअर स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं म्हटलं आहे.

'पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्तक असल्याने सर्जिकल स्ट्राईक होणार नाही असे लोक म्हणत होते. पण नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाने तेराव्या दिवशीच एअर स्ट्राईक करण्यात आला. यामध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला' असे अमित शहा यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये रविवारी (3 मार्च) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. 

अमित शहा यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या हाती लागले. मात्र मोदी सरकारचा प्रभाव इतका होता की, 48 तासांच्या आत त्यांची सुटका करावी लागली. इतक्या कमी वेळात सुटका होण्याची जगातील ही पहिली घटना असल्याचं सांगितलं. अमेरिका आणि इस्त्रायल नंतर सैन्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेणारा भारत हा जगातील तिसरा देश आहे असे ते म्हणाले.

एअर स्ट्राईकवरील विरोधकांचे वक्तव्य पाकिस्तानच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. तसेच एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन विरोधी पक्ष पाकिस्तानला संधी देत आहेत. तुम्ही मोदी सरकार आणि सैन्याच्या पाठिमागे उभे राहू शकत नसाल तर कमीत कमी शांत राहा असेही अमित शहा यांनी म्हटले आहे.

विंग कमांडर अभिनंदन यांच्या पाठीच्या कण्याला, बरगड्यांना दुखापत 

मिग 21 विमान पाकव्याप्त काश्मीर कोसळल्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन दोन दिवसांपूर्वी मायदेशात परतले. त्यांच्या पाठीच्या कण्याच्या खालील भागाला आणि बरगड्यांना इजा झाली असल्याचं वैद्यकीय चाचणीतून समोर आलं आहे. लष्कराच्या रुग्णालयात अभिनंदन यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. एमआरआय स्कॅनमध्ये कोणतीही दुखापत दिसलेली नाही. मात्र पाठीच्या कणाच्या खालील भागाला इजा झाली आहे. मिग 21 विमान कोसळत असताना अभिनंदन पॅराशूटच्या मदतीनं बाहेर पडले. जमिनीवर येत असताना त्यांना ही दुखापत झाली असण्याची शक्यता आहे. पॅराशूटच्या मदतीनं जमिनीवर उतरल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिकांनी अभिनंदन यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या बरगड्यांना इजा झाली. अभिनंदन यांनी स्थानिकांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी हवेत गोळीबार केला आणि धावण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलं. मात्र त्याआधी अभिनंदन यांनी मोठ्या शिताफीनं त्यांच्याजवळ असणारी कागदपत्रं नष्ट केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदImran Khanइम्रान खान