सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीपूर्वी मोदींच्या घरी पोहोचले अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 01:24 PM2021-06-24T13:24:20+5:302021-06-24T13:25:50+5:30

PM Narendra Modi meeting on Jammu and Kashmir : या बैठकीला पंतप्रधान मोदीं यांच्या शिवाय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांयासह अनेक वरिष्ठ अधिकारी भाग घेतील.

Amit Shah reached Modi's house before the meeting with Kashmiri leaders | सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीपूर्वी मोदींच्या घरी पोहोचले अमित शाह

सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीपूर्वी मोदींच्या घरी पोहोचले अमित शाह

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू-काश्मीरच्या नेत्यांमध्ये आज बैठक होणार आहे. दुपारी 3 वाजताच्या सुमारास सुरू होणाऱ्या या बैठकीपूर्वीच गृह मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बैठक सुरू आहे. 5 ऑगस्ट, 2019 रोजी आर्टिकल 370 आणि 35A हटविल्यानंतर आणि राज्याच्या पुनर्रचनेनंतर पंतप्रधान मोदींची राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत पहिल्यांदाच बैठक होत आहे. (Amit Shah reached Modi's house before the meeting with Kashmiri leaders)

या बैठकीचा अजेंडा अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही. मात्र, राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते. महत्वाचे म्हणजे विधानसभा मतदारसंघांच्या सीमांकनासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच आयोगाची निर्मिती केली आहे. या आयोगाने आपले कामही सुरू केले आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदीं यांच्या शिवाय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांयासह अनेक वरिष्ठ अधिकारी भाग घेतील.

पंतप्रधान मोदींच्या महाबैठकीपूर्वी जम्मूत निदर्शनं; मुफ्तींच्या पाकिस्तानवरील वक्तव्याचा विरोध 

महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतजम्मू-काश्मीरसंदर्भात बोलावलेल्या या बैठकीपूर्वीच राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

यातच, जम्मू काश्मीर प्रकरणी पाकिस्तानसोबत चर्चा करण्याच्या मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याविरोधात राज्यात निदर्शने सुरू झाली आहेत. डोगरा फ्रन्टच्या नागरिकांनी गुरूवारी राज्यात ठिकाणी महबुबा यांच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी डोगरा फ्रन्टच्या लोकांनी मेहबुबा मुफ्तींच्या विरोधात घोषणाबाजी केली, तसेच त्यांना तुरुंगात पाठवण्याचीही मागणी केली.

डोगरा फ्रन्टशिवाय युनायटेड जम्मू नावाच्या संघटनेनेही जम्मूमध्ये निदर्शने केली. परंतु ही निदर्शने मोदी सरकार विरोधात करण्यात आली. यामध्ये जम्मू काश्मीरबाबतच्या बैठकीत गुपकार संघटनेला बोलावणे आणि जम्मू क्षेत्रातील संघटनेला न बोलावण्याचा विरोध करण्यात आला.

 

Web Title: Amit Shah reached Modi's house before the meeting with Kashmiri leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.