काँग्रेसच्या पोस्टरवर अमित शहा रावण

By Admin | Updated: October 10, 2016 20:31 IST2016-10-10T20:25:48+5:302016-10-10T20:31:53+5:30

पोस्टरबाजीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पोस्टरमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना रावण तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना राम दाखवण्यात आले आहे.

Amit Shah Ravan on Congress poster | काँग्रेसच्या पोस्टरवर अमित शहा रावण

काँग्रेसच्या पोस्टरवर अमित शहा रावण

ऑनलाइन लोकमत

अलहाबाद, दि. १० - प्रियंका गांधी यांना दुर्गामातेचा अवतार असे संबोधणारे आणि त्यांनी राजकारणात यावे अशी मागणी करणारे उत्तर प्रदेश येथील काँग्रेसचे नेते हसीब अहमद आणि श्रीशचंद्र दुबे यांनी वादग्रस्त पोस्टर तयार केले आहे. या पोस्टरबाजीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पोस्टरमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना रावण तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना राम दाखवण्यात आले आहे. 
 
बुराई पर अच्छाई की जीत के लिये, अशा पद्धतीची टॅगलाईन वापरण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधींकडून सर्जिकल स्ट्राईक, अमित शहा जागे व्हा, असाही पोस्टरवर उल्लेख करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि अमित शहा यांचे हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. तर याबाबत भाजपा नेत्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हसीब अहमद आणि श्रीशचंद्र दुबे यांनी राहुल आणि शहा यांचे रावण दहनासारखे पोस्टर तयार केले आहे.  

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या निवडणुकाचं बिगुल वाजलं आहे. सर्व पक्षांनी प्रचार करण्याची तयारी सुरू केली आहे. 

Web Title: Amit Shah Ravan on Congress poster