"दान आपल्या मालमत्तेचं करता येतं, सरकारी मालमत्तेचं...; वक्फ विधेयकावर अमित शाह स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 19:22 IST2025-04-02T19:21:31+5:302025-04-02T19:22:46+5:30
शाह काँग्रेसवर थेट हल्ला करताना म्हणाले, "वक्फ विदेयकावर 2013 मध्ये जे संशोधन आले, ते आले नसते, तर आज हे संशोधन आणण्याची गरज पडली नसती. त्यावेळी काँग्रेस सरकारने दिल्लीतील 125 लुटियन्स मालमत्ता वक्फला दिल्या. उत्तर रेल्वेची जमीन वक्फला देण्यात आली. हिमाचलमध्ये वक्फ जमीन असल्याचा दावा करून एक मशीद बांधण्यात आली."

"दान आपल्या मालमत्तेचं करता येतं, सरकारी मालमत्तेचं...; वक्फ विधेयकावर अमित शाह स्पष्टच बोलले
वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment Bill) आज (02 अप्रैल) लोकसभेत सादर करण्यात आले आहे. त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीए पूर्णपणे तयारीत आहे. या विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही भाग घेतला. यावेळी त्यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, दान आपल्या संपत्तीचे केले जाऊ शकते. सरकारी जमिनींचे नाही. ते म्हणाले वक्फ एक प्रकारचे चॅरिटेबल एंडोरमेंट आहे. यात व्यक्ती पवित्र दान करते. दान अशाच गोष्टीचे केले जाते जी आपली आहे. सरकारी मालमत्ता अथवा इतर कुणाच्या मालमत्तेचे दान करता येत नाही. ही संपूर्ण चर्चा याच मुद्द्याव आहे.
लोकसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, मी या विधेयकाच्या बाजूने बोलत आहे. मला वाटते, एक तर निर्दोष भावनेने अथवा राजकीय कारणांमुळे सदस्यांच्या मनात अनेक गैरसमज आहेत आणि ते पसरवण्याचे कामही सुरू आहे. मी काही गोष्टरी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन. वक्फ एक अरबी शब्द आहे. याचा इतिहास काही हदीसशी संबंधित सापडतो. आज ज्या अर्थाने वक्फ शब्दाचा वापर केला जातो, त्याचा अर्थ आहे अल्लाहच्या नावावर मालमत्तेचे दान. आम्ही आज जो अर्थ समजत आहोत, तो इस्लाम चे दुसरे खलीफा उमर यांच्या काळात अस्तित्वात आला."
शाह काँग्रेसवर थेट हल्ला करताना म्हणाले, "वक्फ विदेयकावर 2013 मध्ये जे संशोधन आले, ते आले नसते, तर आज हे संशोधन आणण्याची गरज पडली नसती. त्यावेळी काँग्रेस सरकारने दिल्लीतील 125 लुटियन्स मालमत्ता वक्फला दिल्या. उत्तर रेल्वेची जमीन वक्फला देण्यात आली. हिमाचलमध्ये वक्फ जमीन असल्याचा दावा करून एक मशीद बांधण्यात आली." यावेळी शाह यांनी, तामिळनाडूपासून कर्नाटकपर्यंतची काही उदाहरणे दिली ज्यावर विरोधकांनी गदारोळ केला आणि त्यांच्यावर सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप केला.