Amit Shah :2024 मध्ये पीएम मोदींना प्रतिस्पर्धी नाही, जनतेला विरोधी पक्ष निवडून द्यावा लागेल: अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 12:25 IST2023-02-14T12:24:14+5:302023-02-14T12:25:08+5:30
मोदी सरकार काळात लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे, 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपविरोधात कोणीही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीही प्रतिस्पर्धी नाही, असा विश्वास गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

Amit Shah :2024 मध्ये पीएम मोदींना प्रतिस्पर्धी नाही, जनतेला विरोधी पक्ष निवडून द्यावा लागेल: अमित शाह
मोदी सरकार काळात लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे, 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपविरोधात कोणीही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीही प्रतिस्पर्धी नाही, असा विश्वास गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. एका मुलाखतीत अमित शाह यांनी हे वक्तव्य केले आहे. लोक मनापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो करत आहेत. 2024 च्या निवडणुकीत देशातील जनतेला भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष निवडून द्यायचा आहे, असंही गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'विरोधकांनी कदाचित निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये प्रचार केला नसेल, पण त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय निवडणुकीच्या निकालांवरून राज्यांमध्ये विरोधी पक्षाची ताकद दिसून येईल. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह यावर्षी होणाऱ्या नऊ विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची चांगली कामगिरी होईल, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला.
'पीएम मोदी 8 वर्षांच्या अल्प कालावधीत 51 वेळा ईशान्येकडील राज्यांमध्ये आले आहेत. स्वातंत्र्यानंतर कोणत्याही पंतप्रधानांनी असे केलेले नाही. आज ईशान्येकडील राज्यातील जनतेला माहित आहे की नरेंद्र मोदी सरकारने त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम केले आहे, असंही अमित शाह म्हणाले.
Gautam Adani: अदानी समुहावरील घोटाळा आरोपावर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
"देशाची प्रगती, सुरक्षा आणि अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनवणे हे सरकारचे प्राधान्य आहे." भारताच्या कामगिरीची जगानेही दखल घेतली आहे. आठ वर्षांच्या अल्प कालावधीत देशातील 60 कोटी गरीब लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्यात आम्हाला यशही आले, असंही अमित शाह म्हणााले.
'रेल्वे आणि अंतराळ क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. आम्ही या क्षेत्रात अग्रेसर होण्याची तयारी करत आहोत. ड्रोनच्या क्षेत्रातही आपण पुढे जात आहोत. ज्या तीन राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत, ती ती राज्ये आहेत जिथे काँग्रेस पूर्वी मजबूत होती. या राज्यात मतमोजणीच्या दिवशी दुपारी 12 वाजण्यापूर्वी भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला.