अमित शाह यांच्या फॉलोअर्सची संख्या कोटींवर; PM मोदी सर्वांत आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 09:43 IST2023-12-30T09:43:08+5:302023-12-30T09:43:50+5:30

अमित शाह यांच्या फॉलोअर्सची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे. 

amit shah number of followers in crores | अमित शाह यांच्या फॉलोअर्सची संख्या कोटींवर; PM मोदी सर्वांत आघाडीवर

अमित शाह यांच्या फॉलोअर्सची संख्या कोटींवर; PM मोदी सर्वांत आघाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘इन्स्टाग्राम’ या सोशल मीडिया मंचावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फॉलोअर्सची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे. 

शाह यांचे सोशल मीडिया ‘एक्स’वर ३.४१ कोटी फॉलोअर्स, ‘इन्स्टाग्राम’वर १.०७ कोटी फॉलोअर्स आणि ‘फेसबुक’वर १.५ कोटी फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर अमित शाह हे एकमेव नेते आहेत ज्यांचे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. त्याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ‘फेसबुक’वर ६८ लाख, ‘इन्स्टाग्राम’वर ५१ लाख आणि ‘एक्स’वर २.४७ कोटी फॉलोअर्स आहेत.

Web Title: amit shah number of followers in crores