Amit Shah Challenges Rahul Gandhi : गुजरात दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. काँग्रेस आणि तिचे नेतृत्व नेहमीच जनतेला दिशाभूल करत असल्याचा आरोप करत शाह यांनी म्हटले की, मोदी सरकारने व्यापार करारांमध्येही शेतकरी आणि डेअरी क्षेत्राचे हित सुरक्षित ठेवले आहे, काँग्रेस केवळ चुकीची माहिती पसरवत आहे.
काँग्रेसने संसदेत तथ्य सांगावीत
अमित शाह म्हणाले की, संसदेत राहुल गांधी शेतकऱ्यांच्या हिताची भाषा करतात, मात्र त्यांनी हेही सांगायला हवे की, मनमोहन सिंग सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांकडून किती धान्य खरेदी करण्यात आले आणि नरेंद्र मोदी सरकारच्या 10 वर्षांत किती धान्य खरेदी झाले. शाह यांच्या दाव्यानुसार, सध्याच्या सरकारने काँग्रेसच्या तुलनेत 15 पट अधिक धान्य खरेदी केली आहे, मात्र ही बाब राहुल गांधींना दिसत नाही.
बजेटमध्ये मोठी वाढ...
गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठीचे बजेट फक्त 26 हजार कोटी रुपये होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तो 1 लाख 29 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. हेच शेतकऱ्यांप्रती सरकारच्या बांधिलकीचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
राहुल गांधींना खुले आव्हान
अमित शाह यांनी राहुल गांधींना खुले आव्हान देत म्हटले की, कोणत्याही मंचावर या, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चेसाठी तयार आहे. खरंतर शेतकऱ्यांचे नुकसान कोणी केले, यावर उघड चर्चा व्हावी, कारण मोदी सरकारने प्रत्येक करारात शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे शाहांनी म्हटले
दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये
अमित शाह यांच्या मते, काँग्रेसने 70 वर्षांत केवळ एकदाच कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना गोंधळात टाकले. याउलट, मोदी सरकार गेल्या 10 वर्षांपासून दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत थेट 6 हजार रुपये जमा करत आहे, जेणेकरून त्यांना कर्ज घेण्याची गरज भासू नये.
डेअरी क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित
व्यापार करारांच्या मुद्द्यावर राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत अमित शाह म्हणाले की, इंग्लंड, युरोपियन युनियन (EU) आणि अमेरिकेसोबत झालेल्या करारांमध्ये शेतकऱ्यांचे हित पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. डेअरी क्षेत्राबाबत पसरवण्यात येणाऱ्या शंकांचा फेटाळा लावत त्यांनी स्पष्ट केले की, डेअरी सेक्टर पूर्णपणे संरक्षित आहे. तसेच भारतीय कृषी उत्पादने आणि मच्छीमारांच्या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत, असेही शाह यांनी सांगितले.
Web Summary : Amit Shah challenged Rahul Gandhi to debate farmers' issues, accusing Congress of misinformation. Shah highlighted increased government procurement and budget for farmers under Modi, ensuring trade deals protect their interests, dismissing concerns about the dairy sector.
Web Summary : अमित शाह ने राहुल गांधी को किसानों के मुद्दों पर बहस करने की चुनौती दी, और कांग्रेस पर गलत सूचना फैलाने का आरोप लगाया। शाह ने मोदी के तहत किसानों के लिए बढ़ी हुई सरकारी खरीद और बजट पर प्रकाश डाला, यह सुनिश्चित करते हुए कि व्यापार सौदे उनके हितों की रक्षा करते हैं।