शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

CAA: राहुल, ममता, केजरीवालांची भाषा इम्रान खान यांच्यासारखीच; शहांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 17:32 IST

कितीही विरोध करा, नागरिकत्व देणारच; शहांचा काँग्रेसवर निशाणा

जबलपूर: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं कितीही विरोध केला तरीही आम्ही सर्वांना नागरिकत्व देणारच, अशा शब्दांत शहा काँग्रेसवर बरसले. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांची भाषा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासारखी असल्याचा आरोप त्यांनी केला. ते मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये बोलत होते.  

भारतावर जितका तुमचा आणि माझा अधिकार आहे, तितकाच अधिकार पाकिस्तानहून आलेल्या शरणार्थींचादेखील असल्याचं शहा म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. 'आज काँग्रेस नेते देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं करत आहेत. पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू शरणार्थींना स्वीकारा, असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. मात्र राहुल गांधी आणि काँग्रेसला महात्मा गांधींचा विसर पडला आहे,' अशा शब्दांत शहांनी राहुल गांधींवर टीका केली.  

काँग्रेस पक्ष, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, कम्युनिस्ट पक्ष एकत्र येऊन देशाच्या जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शहांनी केला. नागरिकत्व कायद्यात कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. उलट या कायद्याच्या आधारे नागरिकत्व दिलं जाणार आहे, असं गृहमंत्री म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद असल्यास राहुल गांधी आणि ममता बॅनर्जींनी ती शोधून दाखवावी, असं थेट आव्हान शहांनी दिलं. 'काँग्रेसनं धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली. त्यावेळी पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमधल्या हिंदू, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन धर्मीयांना भारतात यायचं आहे. मात्र त्यावेळची परिस्थिती अतिशय वाईट होती. त्यामुळे आपल्या देशातल्या सर्व नेत्यांनी त्यांना तिथेच राहण्याचा सल्ला दिला. भविष्यात तुम्ही भारतात याल, तेव्हा तुमचं स्वागत होईल. तुम्हाला भारताचं नागरिकत्व दिलं जाईल, असं आश्वासन त्यावेळी भारतातल्या नेत्यांनी पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांकांना दिलं होतं,' असं शहा म्हणाले. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवालMamata Banerjeeममता बॅनर्जी