शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

शाह आणि अधीर यांच्यात वार-पलटवार, 'मुर्गी-अंडा-मुर्गी' वक्तव्यावर लोकसभेत एकच हशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 19:12 IST

अमित शाह भाषण देत असताना अधीर त्यांना सातत्याने टोकत होते. मग काय, अमित शाह यांनीही त्यांच्यावर 'इशाऱ्या-इशाऱ्यात' निशाना साधायला सुरुवात केली. (Amit Shah attacks on Adhir Ranjan Chowdhury)

ठळक मुद्देशाह म्हणाले, जर अधीर रंजन चौधरी यांनी पक्ष बदलला नसता, तर ते जिंकू शकले नसते.शाह यांच्या भाषणानंतर झालेल्या वाद-विवादानंतर 'मुर्गी-अंडा-मुर्गी'वरही लोकसभेत जोरदार हशा पिकला.अमित शाह भाषण देत असताना अधीर त्यांना सातत्याने टोकत होते.

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शनिवारी लोकसभेत (Lok Sabha) जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक 2021वर चर्चा केली. शाह बोलताना काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांच्यावर सातत्याने निशाणा साधत होते. (Amit Shah attacks on Adhir Ranjan Chowdhury with hen egg hen jibe in Lok Sabha)

यावेळी शाह म्हणाले, जर अधीर रंजन चौधरी यांनी पक्ष बदलला नसता, तर ते जिंकू शकले नसते. शाह यांच्या भाषणानंतर झालेल्या वाद-विवादानंतर 'मुर्गी-अंडा-मुर्गी'वरही लोकसभेत जोरदार हशा पिकला. अमित शाह भाषण देत असताना अधीर त्यांना सातत्याने टोकत होते. मग काय, अमित शाह यांनीही त्यांच्यावर 'इशाऱ्या-इशाऱ्यात' निशाना साधायला सुरुवात केली.

स्वत:कडे पाहून मग ठरवा तुम्ही हिशोब मागण्याच्या लायकीचे आहात की नाही; अमित शाह यांचा हल्लाबोल

शाह यांचे भाषण संपल्यानंतर अधीर रंजन यांनी सभापतींकडे बोलण्याची परवानगी मागितली. ते म्हणाले सकाळी आपल्या अर्थमंत्र्यांनी भाषण दिले आणि आता गृह मंत्री अमित शाह यांनी. असे वाटते, की दोघांनी दोन राज्यांच्या अर्थसंकल्पावर भाषण दिले आहे.

एक हिंदुस्तानच्या अर्थसंकल्पावर तर दुसरे जम्मू-काश्मीरच्या अर्थसंकल्पावर. सकाळी सूर्य उगवतो, तेव्हा थोडा अंधार असतो. सूर्य उगवण्यापूर्वी कोंबडे बांग द्यायला लागतात. त्यांना वाटते, की त्यांच्या बांग देण्यामुळेच सूर्य उगवतो आणि जगात उजेड पडतो.

Amit Shah in Lok Sabha : अमित शाहंचा ओवेसींवर निशाणा, "तुमच्या मनात सर्वकाही हिंदू-मुस्लीम... मी समजतो"

अमित शाहंच्या 'मुर्गी-अंडा-मुर्गी' वक्तव्यावर हशा पिकला - अधीर रंजय चौधरी यांनी एवढे म्हणताच, अमित शाह यांनी सभापतींकडे बोलण्याची परवानगी मागितली. यानंतर शाह म्हणाले, जेव्हा एखाद्या मंत्र्याचे भाषण संपते तेव्हा मुद्दे त्याच्याशी संबंधित असायला हवे. अधीर यांना माझ्या भाषणाच्या एखाद्या मुद्द्यावर बोलायचे असेल तर बोलावे. मंत्र्याच्या भाषणानंतर 'मुर्गी-अंडा-मुर्गी' येत नाही. शाह यांनी अधीर यांच्यावर केलेल्या या पलटवारानंतर लोकसभेत एकच हशा उडाला. 

तुम्ही तर मोबाईलच बंद केले होते  -तत्पूर्वी, आपल्या भाषणादरम्यान अमित शाह यांनी काश्मिरातील मोबाईल सेवेवरूनही अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला चढवला होता. "तुम्ही आम्हाला विचारत आहात? तुम्ही तर मोबाईलच बंद केले होते आणि तेही 20 वर्षांसाठी बंद केले होते. त्यावेळी सर्व अधिकार कुठे गेले होते?," असा सवाल शाह यांनी केला.

इस्लाम अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या दलितांना आरक्षणाचा लाभ नाही : रविशंकर प्रसाद

ओवेसींवरही हल्ला -जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक 2021वर बोलताना शाह यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही निशाणा साधला. "तुम्ही अधिकाऱ्यांचे हिंदू मुस्लीम म्हणून विभाजन करत आहात. तुमच्या मनात प्रत्येक गोष्ट हिंदू मुस्लीम आहे. मी तर तुम्हाला समजतो. एक मुस्लीम अधिकारी हिंदू जनतेची आणि हिंदू अधिकारी मुस्लीम जनतेची सेवा करू शकत नाही का? अधिकाऱ्यांना हिंदू मुस्लीम असे विभागून तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणवता का?," असा टोला शाह यांनी ओवेसींनाही लगावला. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीJammu Kashmirजम्मू-काश्मीर