Ambani Family: मुकेश अंबानींच्या नातवाची झलक; आई श्लोकासोबत स्पॉट झाला पृथ्वी, पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 19:13 IST2022-03-15T19:10:16+5:302022-03-15T19:13:04+5:30
Ambani Family: पृथ्वी हा आकाश आणि श्लोका अंबानी यांचा मुलगा आहे.

Ambani Family: मुकेश अंबानींच्या नातवाची झलक; आई श्लोकासोबत स्पॉट झाला पृथ्वी, पाहा Photos
नवी दिल्ली: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वी अंबानी आज आई श्लोका अंबानीसोबत मुंबईत स्पॉट झाला. पृथ्वी हा मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाशचा मुलगा आहे. आकाशने 2019 मध्ये श्लोकासोबत लग्न केले होते. या चित्रांमध्ये पृथ्वी आई श्लोकाच्या कडेवर दिसून येत असून, त्याची आई पृथ्वीला शाळेत घेऊन जात असल्याचे दिसत आहे.
पृथ्वी अंबानीचा जन्म 10 डिसेंबर 2020 रोजी झाला. सध्या तो नर्सरीमध्ये शिकत आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर विविध कमेंट्सही येत आहेत. 9 मार्च 2019 रोजी आकाश आणि श्लोकाचे लग्न झाले होते. त्यावेळी त्या लग्नाची जगभरात जोरदार चर्चा झाली होती. कारण, आकाशच्या लग्नात बॉलिवूड स्टार्सपासून विविध देशातील प्रतिष्ठीत लोकांनी हजेरी लावली होती.