शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

अॅमेझॉनकडून कर्मचारी कपात सुरू; भारतात 60 कर्मचाऱ्यांना नारळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 2:06 PM

येत्या काही दिवसांमध्ये अॅमेझॉनकडून आणखी काही कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो

ई-कॉमर्स क्षेत्रातील मातब्बर कंपनी असलेल्या अॅमेझॉनने भारतातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने गेल्याच आठवड्यात 60 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. अॅमेझॉनकडून सध्या विविध देशांमधील त्यांच्या कारभाराचा आढावा घेतला जात आहे. याच अंतर्गत कंपनीने भारतातील कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये अॅमेझॉनकडून आणखी काही कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी माहिती कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. यासाठी कंपनीने 25 टक्के कर्मचाऱ्यांचा समावेश पर्फॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लानमध्ये केला आहे. 60 कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्यात आल्याच्या वृत्ताला अॅमेझॉन इंडियाकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. जागतिक स्तरावर कंपनीच्या ढाच्यात काही बदल केले जात असल्याची माहिती कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्याच अंतर्गत ही कर्मचारी कपात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 'इकॉनॉमिक टाईम्स'ने या संदर्भातील वृत्त दिले आहे. एक जागतिक कंपनी असल्याने सुनियोजितपणे टीमची उभारणी करण्याची गरज असल्याचे आमच्या लक्षात आले आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. 'उपलब्ध क्षमतेचा संपूर्ण वापर करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. याचा परिणाम काही कर्मचाऱ्यांवर झाला आहे. त्या कर्मचाऱ्यांना आम्ही पूर्ण सहाय्य करत आहोत,' अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली. अॅमेझॉनने याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सिएटलस्थित मुख्यालयातील काही कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. त्यावेळीच याचा परिणाम भारतासह जगभरात दिसेल, अशी शक्यता व्यापार जगतात व्यक्त करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी अॅमेझॉनने भारतातील व्यवसायाचा नव्याने प्रारंभ करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळेच अॅमेझॉनने काही कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.  

टॅग्स :amazonअॅमेझॉनEmployeeकर्मचारीIndiaभारत