अमरनाथ भाविकांवर हल्ल्याचे सावट

By Admin | Updated: March 18, 2016 01:53 IST2016-03-18T01:53:00+5:302016-03-18T01:53:00+5:30

अमरनाथ यात्रा आणि वैष्णोदेवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. पठाणकोट-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता

Amarnath attackers attack | अमरनाथ भाविकांवर हल्ल्याचे सावट

अमरनाथ भाविकांवर हल्ल्याचे सावट

- सुरेश डग्गर,  जम्मू
अमरनाथ यात्रा आणि वैष्णोदेवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. पठाणकोट-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता पोलिसांनीच वर्तवली आहे.
पोलिसांचा इशारा कठुआ जिल्ह्यासाठी असला तरी अमरनाथ यात्रेकरू आणि वैष्णोदेवीच्या भक्तांना याच मार्गाने जावे लागते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेपुढे प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता
आहे.
ही दोन्ही भक्तीस्थळे ज्या महामार्गांवर आहेत, तो सांबा आणि कठुआमधूनच जातो. तेथून रेल्वे मार्ग चार किलोमीटरवर आणि पाकिस्तानची सीमा तीन किलोमीटर अंतरावर आहे.
जम्मूच्या पाकिस्तानला खेटून असलेल्या सीमेवरील सर्व शाळांना सुरक्षा वाढवण्याच्या आणि सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
कठुआचे विशेष पोलीस अधीक्षक नवीन जैन यांनी महामार्गांवरील सुरक्षा वाढवण्याचेही आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेच्या संपूर्ण मार्गांवरील सुरक्षाही आताच वाढवण्यात आली आहे.

Web Title: Amarnath attackers attack