शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

अमरिंदरसिंग राजा ब्रार युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

नवी दिल्ली-पंजाबमधील आमदार अमरिंदर सिंग राजा ब्रार यांची राष्ट्रीय युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी काँग्रेसने गुरुवारी नियुक्ती केली. संस्थात्मक फेरबदलाच्या धोरणान्वये माजी अध्यक्ष आमदार राजीव सातव यांच्या जागी ब्रार यांना नियुक्त केले आहे. पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ब्रार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांना तात्काळ नियुक्त केल्याचे सांगितले.

नवी दिल्ली-पंजाबमधील आमदार अमरिंदर सिंग राजा ब्रार यांची राष्ट्रीय युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी काँग्रेसने गुरुवारी नियुक्ती केली. संस्थात्मक फेरबदलाच्या धोरणान्वये माजी अध्यक्ष आमदार राजीव सातव यांच्या जागी ब्रार यांना नियुक्त केले आहे. पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ब्रार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांना तात्काळ नियुक्त केल्याचे सांगितले.
गिद्देरबहा मतदारसंघातील ३७ वर्षीय या आमदारांनी, पक्ष बांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर युवकांना संघटित करण्यावर आपला भर राहणार असल्याचे सांगितले. तसेच भाजपाच्या केंद्रातील सरकारच्या अपयशाला समोर आणून त्याविरुद्ध निदर्शने करणे आणि अन्य कार्यक्रमही अग्रक्रमाने राबविण्यात येणार असल्याचे सांगून संघटनेत एक नवी जीवनपद्धती रुजविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. राहुल गांधींनी सुरू केलेल्या मतदान प्रक्रियेनुसार निवडून आलेले ते पहिले पदाधिकारी आहेत.
पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, गुरुदास कामत, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, रमेश चेन्नीथाला, मनीष तिवारी, रणदीप सुरजेवाला, अशोक तनवर यांनी युवा काँग्रेसचे अध्यक्षपद याआधी भूषविले आहे.
आपला व आपल्या कुटुंबाचा राजकारणाशी संबंध नसल्याचे सांगून ब्रार यांनी राहुल गांधींच्या मोहिमेमुळे आपण प्रेरित झाल्याचे म्हटले आहे.