राजस्थानमधूनहुंडा प्रथेच्या विरोधात एक असं उदाहरण समोर आलं आहे, ज्याने लग्नकार्याबाबत समाजाला एक मोठा संदेश दिला आहे. अलवर जिल्ह्यातील कोटपुतली-बहरोड भागात एका नवरदेवाने आणि त्याच्या वडिलांनी लग्नातहुंडा म्हणून दिले जाणारे ३१ लाख रुपये घेण्यास नकार दिला. त्यांच्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
कोटपुतली-बहरोड जिल्ह्यातील बानसूर भागातील बिलाली गावात ही घटना घडली आहे. येथे राहणारे जालिम सिंह यांचा मुलगा धीरेंद्र सिंह शेखावत याची वरात १० फेब्रुवारी रोजी नागपूरमधील लुणसरा गावात पोहोचली होती. लग्नाचे सर्व विधी परंपरेनुसार पार पडत होते. याच दरम्यान वधूपक्षाकडून हुंडा म्हणून ३१ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. सामान्यतः अशा प्रसंगी हुंड्याची रक्कम आणि वस्तूंचे प्रदर्शन केलं जातं आणि सामाजिक दबावही असतो, परंतु या लग्नात चित्र पूर्णपणे वेगळं होतं.
वडिलांचा भावूक निर्णय
नवरदेवाचे वडील जालिम सिंह यांनी सर्वांसमोर हुंड्याची रक्कम घेण्यास नकार दिला. त्यांनी अत्यंत साधेपणाने पण ठामपणे सांगितलं की, "तुम्ही तुमची मुलगी आमच्या स्वाधीन केली आहे, तोच आमच्यासाठी सर्वात मोठा हुंडा आहे. लेकीपेक्षा कोणतीच संपत्ती मोठी नाही" हे ऐकताच लग्न समारंभात उपस्थित असलेले सर्व पाहुणे भावूक झाले. अनेकांनी टासमोर कोणतंही धन-दौलत मोठं नसतं.ळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.
हुंडा प्रथेविरुद्ध धाडसी पाऊल
जालिम सिंह यांनी संपूर्ण रक्कम वधूपक्षाला परत केली. लग्नातील नातेवाईक आणि ग्रामस्थांनी याला हुंडा प्रथेविरुद्धचे एक धाडसी पाऊल म्हटलं आहे. गावातील ज्येष्ठांचे म्हणणे आहे की, आजच्या काळात जिथे हुंड्यावरून वाद आणि छळाच्या घटना समोर येतात, तिथे असे उदाहरण समाजाला नवी दिशा देते.
ग्रामस्थांच्या मते, या कुटुंबाने हे सिद्ध केले आहे की विवाह हा कोणताही आर्थिक व्यवहार नसून दोन कुटुंबांचा आणि दोन जीवांचा पवित्र बंध आहे. लग्नाला देवाण-घेवाणीचे साधन बनवण्याची विचारसरणीच हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेला खतपाणी घालतं. जर जास्तीत जास्त कुटुंबांनी असा संकल्प केला, तर हुंडा प्रथा मोठ्या प्रमाणात थांबवता येईल. या लग्नामुळे तरुणांमध्येही सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.