Alauddin Khilji character in Padmaavat reminded me of Azam Khan Jaya Prada | 'पद्मावत'मधला खिलजी पाहून मला आझम खान आठवतात- जयाप्रदा

'पद्मावत'मधला खिलजी पाहून मला आझम खान आठवतात- जयाप्रदा

नवी दिल्ली: 'पद्मावत' चित्रपटातील अल्लाउद्दीन खिलजीचे पात्र पाहिल्यानंतर मला आझम खान आठवतात, असे विधान भाजपा खासदार जयाप्रदा यांनी केले आहे. त्या शनिवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, मी जेव्हा 'पद्मावत' चित्रपट बघत होते, तेव्हा खिलजीचे पात्र पाहून माझ्या डोळ्यांसमोर आझम खानच आले. उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवताना आझम खान यांनी मला प्रचंड त्रास दिला होता. त्यामुळे मला ते खिलजीसारखे वाटत असल्याचे जयाप्रदा यांनी म्हटले. 

लोकसभा निवडणुकीपूर्वीही मला आझम खान यांच्या उन्मत्तपणाची आणि त्यांनी रचलेल्या कटकारस्थानांचा अनुभव आला होता. 2009 मध्ये आझम खान यांनी जयाप्रदा यांची बदनामी  करणारे फलक लावले होते. त्यानंतर 2012 सालीही दोन्ही नेत्यांमधील शत्रुत्त्व आणखी वाढले होते. त्यानंतर जयाप्रदा यांनी खान यांचा उन्मत्तपणा धुळीला मिळवण्याची शपथ घेतली होती.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alauddin Khilji character in Padmaavat reminded me of Azam Khan Jaya Prada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.