अलंकार अग्निहोत्री यांनी निलंबनाचा आदेश धुडकावला, म्हणाले, ‘आधीच राजीनामा दिल्यामुळे…’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 11:37 IST2026-01-27T11:36:43+5:302026-01-27T11:37:58+5:30

Alankar Agnihotri: उत्तर प्रदेशमधील बरेली येथे तैनात असलेले शहर दंडाधिकारी अलंकार अग्निहोत्री यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र अग्निहोत्री यांनी निलंबनाचा आदेश धुकडावून लावला आहे. मी आधीच राजीनामा दिलेला असल्याने या निलंबनाला काहीच अर्थ नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Alankar Agnihotri rejected the suspension order, saying, ‘Since he has already resigned…’ | अलंकार अग्निहोत्री यांनी निलंबनाचा आदेश धुडकावला, म्हणाले, ‘आधीच राजीनामा दिल्यामुळे…’

अलंकार अग्निहोत्री यांनी निलंबनाचा आदेश धुडकावला, म्हणाले, ‘आधीच राजीनामा दिल्यामुळे…’

उत्तर प्रदेशमधील बरेली येथे तैनात असलेले शहर दंडाधिकारी अलंकार अग्निहोत्री यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र अग्निहोत्री यांनी निलंबनाचा आदेश धुकडावून लावला आहे. मी आधीच राजीनामा दिलेला असल्याने या निलंबनाला काहीच अर्थ नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अग्निहोत्री यांनी राजीनामा मागे घण्यास स्पष्ट शब्दात नकार दिली आहे. तसेच त्यांनी काही गंभीर आरोपही केले आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्यावर दबाव आणण्यात आला. एका फोनवर आपल्याला वेडा ब्राह्मण म्हणून अपमानित करण्यात आले. फोनवर अपमानित करणाऱ्या या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच आपल्या भूमिकेवर ठाम राहत आपल्या समाजाच्या सन्मानासाठी पदाचा त्याग केल्याचे अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.

बरेलीमध्ये शहर दंडाधिकारी पदावर असलेल्या अलंकार अग्निहोत्री यांच्या निलंबनाटे आदेश सरकारने दिले होते. मात्र अग्निहोत्री यांनी आपण आधीच राजीनामा दिला असल्याचे सांगत हा आदेश धुडकावून लावला आहे. सोबतच या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी अलंकार अग्निहोत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

याबरोबरच राजीनामा दिल्यानंतर अलंकार अग्निहोत्री यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. रात्री उशिरा आपलं सरकारी निवास्थान सोडताना त्यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. तसेच लवकरच त्यांची भेटही होईल. आता मी राजीनामा मागे घेणार नाही. तसेच आता माझ्या भविष्याचा निर्णय माझ्या समाजातील लोकच करतील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सरकारने शिस्तभंगाच्या आधारावर अलंकार अग्निहोत्री यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले होते. तसेच या प्रकरणाचा विभागिय तपास बरेली विभागाच्या आयुक्तांकडे सोपवण्यात आला आहे.   

Web Title: Alankar Agnihotri rejected the suspension order, saying, ‘Since he has already resigned…’