शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

अखिलेश यादव लॅपटॉपवर, तर योगी-मोदी मिठाच्या पुड्यावर

By सुधीर लंके | Updated: March 6, 2022 06:23 IST

अखेरच्या टप्प्यात ५४ जागांची निवडणूक आहे. यात आजमगढ जिल्ह्यातील सर्वाधिक दहा जागा आहेत.

- सुधीर लंकेलाेकमत न्यूज नेटवर्कआजमगढ : कोरोना प्रतिबंधक लसीच्या प्रमाणपत्रांवर मोदींचे छायाचित्र आहे. त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशात मोफत वितरित केल्या जाणाऱ्या रेशनच्या पाकिटावर मोदी-योगी यांचे फोटो आहेत. निवडणूक आचारसंहितेमुळे हे फोटो हटले, पण प्रशासनाने चलाखीने या पाकिटांवरही भगव्या रंगाची पट्टी टाकत घर घर मोदींचा संदेश पोहोचविला.

निवडणुकीच्या काही महिने आधीपासूनच सरकारने गावोगावी रेशन पोहोचले व त्यातून हा भगवा संदेशही घरोघर गेला. कोरोनामुळे सध्या येथे रेशनकार्डधारकांना एका कार्डवर कुटुंबामागे एक लीटर तेल, एक किलो मीठ व एक किलो डाळ मोफत दिली जात आहे. तसेच गहू व तांदूळ पाच किलो आहेत.

आजमगढ जिल्ह्यातील फुलपूर पवई मतदारसंघातील पालिया गावातील ज्येष्ठ नागरिक हब्बू म्हणाले, ‘गल्ला गरीब लोगो के लिए जरुरी है. लेकिन पाच किलो मे क्या होगा?’. येथे रेशनला गल्ला म्हणतात. हे रेशन देताना मधली मंडळी काटा मारतात असेही त्यांचे म्हणणे होते. विश्वास यादव म्हणाले, ‘सरकार नमक देयलस खराब निकलल’. हे मीठ खराब असल्याची तक्रार येथे भेटलेल्या इतर महिला व पुरुषांनीही केली.

बिलसिया गावातील पंकज चौहान म्हणाले, ‘सरकार कुठलेही असो त्यांनी गरिबांना काही वाटले की ते स्वतःचे फोटो चिकटवतात. अखिलेश सरकारने लॅपटॉप वाटले त्यावरही त्यांचा फोटो होताच’. उत्तर प्रदेशात घरोघर गेलेल्या मिठाच्या पुडीवरही सरकारचा ‘सोच इमानदार, काम दमदार’ हा संदेश होता. तो आचारसंहितेमुळे आता काढण्यात आला आहे.

आजमगढ मे सपा...     अखेरच्या टप्प्यात ५४ जागांची निवडणूक आहे. यात आजमगढ जिल्ह्यातील सर्वाधिक दहा जागा आहेत. या जिल्ह्यात भाजपला गतवेळी केवळ एक, तर समाजवादी पक्षाला ५ व बसपला ४ जागा मिळाल्या होत्या. यावेळीही या बालेकिल्ल्यात समाजवादी पक्षच आघाडीवर राहील, असे फुलपूर मतदारसंघात फिरताना जाणवले.     मोदींनी मी खाल्लेल्या मिठाला जागणार, असा उल्लेख शुक्रवारी मिर्जापूरच्या सभेत केला. पण मोदी व योगी सरकारने दिलेल्या मिठाबद्दल खाली गावांत नाराजी आहे. बिलसिया गावातील पंकज चौहान म्हणाले, ‘सरकार कुठलेही असो त्यांनी गरिबांना काही वाटले की ते स्वतःचे फोटो चिकटवतात.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२