डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:25 IST2025-10-02T14:24:55+5:302025-10-02T14:25:21+5:30
इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्यापासून रोखल्यानंतर महिला लहान मुलासह घरातून गायब झाल्याची घटना समोर आली आहे.

फोटो - आजतक
सोशल मीडियाची आवड आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधील वाद आता राजस्थानातील अजमेर येथील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयापर्यंत पोहोचला. इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्यापासून रोखल्यानंतर महिला तिच्या लहान मुलासह घरातून गायब झाल्याची घटना समोर आली आहे. २० दिवसांपासून गायब असलेल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी पती वणवण करत आहे.
जय किशन याने पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात दिलेल्या तक्रारीत आपली व्यथा मांडली, त्याची पत्नी गेल्या २० दिवसांपासून घरातून गायब झाली आहे. जय किशनच्या पत्नीला सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्याची आवड होती. हळूहळू तिला रीलचं व्यसन लागलं, ज्यामुळे ती घर आणि मुलावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हती.
"मी माझ्या पत्नीला वारंवार सांगितलं की रील बनवण्यात इतका वेळ वाया घालवू नको आणि घरकामावर लक्ष केंद्रित कर. जेव्हा मी तिला रील बनवण्यापासून रोखलं, ओरडलो, तेव्हा ती रागावली" असं जय किशनने म्हटलं आहे. वीस दिवसांपूर्वी त्याची पत्नी कोणालाही न सांगता अचानक घरातून निघून गेली आणि त्याच्या लहान मुलाला सोबत घेऊन गेली.
पत्नी आणि मुलगा अचानक गायब झाल्यानंतर जय किशनने सुरुवातीला सर्वत्र त्यांचा शोध घेतला. त्याने नातेवाईकांकडे चौकशी केली, परंतु कोणताही सुगावा लागला नाही. या काळात, तो सतत तणाव आणि मानसिक त्रास सहन करत होता. अलवर गेट पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती, परंतु पोलीस कारवाईत कोणतीही प्रगती न झाल्याने, जय किशनने न्याय आणि मदतीची अपेक्षा करत आज पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली.