अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:53 IST2025-06-01T12:47:43+5:302025-06-01T12:53:06+5:30

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर, नागालँड मधील नेत्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील गुटाचे समर्थन केले होते. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत NDPP आणि सहकारी भाजपनंतर, NCP राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Ajit Pawar suffers a big setback,seven mlas left ncp and join ndpp in nagaland | अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला

अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) नागालँडमध्ये मोठा झटका बसला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सात आमदारांनी पक्षाला राम-राम ठोकत शनिवारी सत्ताधारी NDPP मध्ये प्रवेश केला. यामुळे आता, मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वाखाली NDPP ला 60 सदस्यीय विधानसभेत संपूर्ण बहुमत मिळाले आहे. तसेच, नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (NDPP) आमदारांची संख्याही 25 वरून 32 वर पोहोचली आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर, नागालँड मधील नेत्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील गुटाचे समर्थन केले होते. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत NDPP आणि सहकारी भाजपनंतर, NCP राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

विधानसभा अध्यक्ष शारिंगैन लोंगकुमेर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, सातही आमदारांनी स्वतः उपस्थित राहून औपचारिक पत्र दिले. यात त्यांच्या NDPP तील प्रवेशासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच, आपला हा निर्णय घटनेतील दहाव्या अनुसूचीनुसार घटनात्मक आवश्यकता पूर्ण करतो, असेही यात सांगण्यात आले आहे.

विधानसभा अध्यक्षांची मंजुरी -
संबंधित आदेशानुसार, नागालँड विधानसभा सदस्य (पक्षांतराच्या आधारावर अपात्रता) नियम, २०१९ नुसार, सभापतींनी या आमदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार पक्ष संलग्नता नोंदी अद्ययावत करण्याचे निर्देश विधानसभा सचिवालयाला दिले. राज्य सरकारमधील मंत्री के. जी. केन्ये पत्रकार परिषदेत म्हणाहे, 'आज सायंकाळी, 7 NCP आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे विलीनीकरण पत्र सादर केले आहेत. यामुळे आमचे मुख्यमंत्री आणि सरकारला बळकटी मिळेल.' 

नगालँडमधील पक्षीय बलाबल -
नगालँडमधील पक्षीय बलाबलाचा विचार करता, NDPP चे 32, भाजपचे 12, NPP चे 5, LJP (रामविलास), नगा पीपुल्स फ्रंट आणि RPI (आठवले) गटाचे प्रत्येकी दो-दो सदस्य, तसेच, जद(यू)चा एक आणि अपक्ष 4 उमेदवार आहेत. 

Web Title: Ajit Pawar suffers a big setback,seven mlas left ncp and join ndpp in nagaland