अजित पवारांच्या विमान अपघाताला दोन महिने, DGCA कडून नवे नियम जारी;... तर पायलट जबाबदार राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 11:10 IST2026-03-28T11:08:34+5:302026-03-28T11:10:03+5:30

Ajit Pawar Plane Crash Baramati: अजित पवार विमान अपघात अपडेट: DGCA चे व्हीआयपी हालचालींसाठी नवे नियम. रोहित पवार यांची बंगळुरूमध्ये झिरो एफआयआर. ५ गंभीर आरोपांमुळे खळबळ.

Ajit Pawar Plane Crash Baramati: Pilots will not bow to pressure from VIPs! New rules from DGCA after Ajit Pawar accident | अजित पवारांच्या विमान अपघाताला दोन महिने, DGCA कडून नवे नियम जारी;... तर पायलट जबाबदार राहणार नाही

अजित पवारांच्या विमान अपघाताला दोन महिने, DGCA कडून नवे नियम जारी;... तर पायलट जबाबदार राहणार नाही

२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आता या अपघाताच्या चौकशीत आणि कायदेशीर प्रक्रियेत दोन मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत.

अपघाताचे मुख्य कारण वैमानिकांवरील दबाव असू शकते, हे लक्षात घेऊन DGCA ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. व्हीआयपी किंवा नेत्यांनी उड्डाणादरम्यान किंवा हवामान खराब असताना वैमानिकावर कोणताही दबाव टाकू नये. प्रवासाच्या नियोजनात शेवटच्या क्षणी बदल करायचा असल्यास तो थेट वैमानिकाला न सांगता ऑपरेटर मॅनेजमेंटमार्फतच करावा लागेल. हवामान किंवा तांत्रिक कारणास्तव वैमानिकाने उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा सन्मान करावा लागेल. आता वैमानिक थेट नकार देऊ शकतात आणि त्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल.

रोहित पवार यांची 'झिरो एफआयआर' आणि ५ गंभीर आरोप:
अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी या अपघाताला 'गुन्हेगारी कट' संबोधत बंगळुरूमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी उपस्थित केलेले ५ संशयास्पद मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • लॉग बुकमध्ये फेरफार: विमानाचे अधिकृत उड्डाण ४,९१५ तास असताना प्रत्यक्षात ते ८,००० तासांपेक्षा जास्त उडवल्याचा दावा.
  • हवामानाचे उल्लंघन: कमी दृश्यमानता (Low Visibility) असतानाही लँडिंगची परवानगी दिली गेली.
  • वैमानिक बदल: शेवटच्या क्षणी क्रू बदलून सुमित कपूर यांना वैमानिक म्हणून सामील केले गेले.
  • विमा पॉलिसी: अपघाताच्या काही काळ आधीच वैमानिक सुमित कपूर यांच्या नावे लाइफ इन्शुरन्स पॉलिसी काढण्यात आली होती.
  • वैमानिकाची पार्श्वभूमी: वैमानिक सुमित कपूर यापूर्वी मद्यप्राशन प्रकरणांमुळे निलंबित झाले होते.
     

अपघाताचा 'प्राथमिक अहवाल'
एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरोने २२ पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. विमानाने लँडिंगपूर्वी उजवीकडे वळण घेतले, ते झाडांना धडकले आणि त्यानंतर जमिनीवर आदळले, असे यात म्हचले होते. जमिनीवर आदळताच विमानाने पेट घेतला, ज्यामुळे कॉकपिट आणि केबिन पूर्णपणे जळून खाक झाले. अपघाताच्या एक दिवस आधी करण्यात आलेल्या तांत्रिक तपासणीत विमानात कोणतीही त्रुटी आढळली नव्हती.

Web Title : अजित पवार के विमान हादसे के बाद DGCA के नए नियम

Web Summary : अजित पवार के विमान हादसे के बाद, DGCA के नए दिशानिर्देश पायलटों को VIP दबाव से बचाते हैं। रोहित पवार ने आपराधिक साजिश का आरोप लगाया, जिसमें लॉगबुक में हेरफेर और पॉलिसी अनियमितताओं का हवाला दिया गया। प्रारंभिक रिपोर्ट में विमान के दुर्घटना से पहले पेड़ों से टकराने का खुलासा।

Web Title : DGCA Issues New Rules After Ajit Pawar's Plane Crash

Web Summary : Following Ajit Pawar's plane crash, DGCA's new guidelines protect pilots from VIP pressure. Rohit Pawar alleges criminal conspiracy, citing logbook tampering and policy irregularities. Initial report reveals plane hit trees before crash.