...अन् अजित डोवालांनी पोलिसांना सांगितली छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवा महालाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 07:37 PM2020-03-05T19:37:21+5:302020-03-05T19:44:36+5:30

ajit doval : 'छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल नेतृत्त्वाचे उत्तम उदाहरण आहे'

ajit doval speaks about chhatrapati shivaji maharaj and his leadership qualities in police program rkp | ...अन् अजित डोवालांनी पोलिसांना सांगितली छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवा महालाची गोष्ट

...अन् अजित डोवालांनी पोलिसांना सांगितली छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवा महालाची गोष्ट

googlenewsNext
ठळक मुद्दे'छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल नेतृत्त्वाचे उत्तम उदाहरण आहे''कायदा व सुव्यवस्था राखणे हे लोकशाहीचे सर्वात पवित्र कार्य आहे''लोकशाहीमध्ये तुम्ही कायद्याबद्दल पूर्णपणे समर्पित राहणे फार महत्वाचे आहे'

नवी दिल्ली : गुरूग्राममध्ये आयोजित पोलिसांच्या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गुरूवारी हजेरी लावली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती, संगठन कौशल्य आणि माणसांची पारख करण्याची कला कशी होती, याची माहिती अजित डोवाल यांनी पोलिसांना दिली. तसेच, प्रशिक्षणादरम्यान कौशल्य विकसित होऊन प्रत्येक पोलीस जीवा महालासारखा तरबेज व्हावा, असेही अजित डोवाल यांनी सांगितले.

अजित डोवाल म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल नेतृत्त्वाचे उत्तम उदाहरण आहे. एकदा घोड्यावरुन जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी  एका व्यक्तीला दांडपट्टा फिरवून उडते पक्षी मारताना पाहिले. त्याला आपल्या सैन्यात सहभागी करून घेतले. प्रशिक्षण दिले. त्याच्या कौशल्यास पैलू पाडले. त्याचे नाव होते जीवा महाला."

ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडावर अफझल खानाला भेटले तेव्हा त्यांच्या सोबत जीवा महाला होता आणि अफझल खानासोबत होता सय्यद बंडा. भेटीदरम्यान अफझल खानाने दगा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी चिलखत घातले होते. त्यामुळे अफझल खानाचा वार फुकट गेला. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करण्यासाठी सय्यद बंडा धावून आला. त्याच्या हातात तलवार होती, ती तो महाराजांवर चालवणार इतक्यात अत्यंत चपळाईने जीवा महालाने बंडावर तलवार चालवली; सय्यद बंडाचा हात खांद्यापासून तुटला. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व कौशल्य याठिकाणी दिसून येते, असे अजित डोवाल यांनी सांगितले.  

याशिवाय, जीवा महाला काय करू शकतो याची पूर्ण कल्पना छत्रपती शिवाजी महाराजांना होती. आपल्या माणसाचे कौशल्य अशा प्रकारे विकसित करायला हवे की प्रत्येक पोलीस जीवा महाला झाला पाहिजे, असे अजित डोवाल म्हणाले. याचबरोबर, यावेळी कायदा व सुव्यवस्था राखणे हे लोकशाहीचे सर्वात पवित्र कार्य आहे. आपण (पोलीस) हे लागू करणार आहात. जर आपण हे करू शकत नाही, तर लोकशाही अपयशी ठरेल. लोकशाहीमध्ये तुम्ही कायद्याबद्दल पूर्णपणे समर्पित राहणे फार महत्वाचे आहे. आपण आपले कार्य योग्यरित्या केले पाहिजे, असेही अजित डोवाल यांनी सांगितले. 

आणखी बातम्या..

संसदेत गोंधळ, काँग्रेसच्या सात खासदारांवर निलंबनाची कारवाई

Delhi Violence : पीडित कुटुंबांना भाजप देणार प्रत्येकी पाच हजार रुपये

Coronavirusची धास्ती, Cognizantकडून ऑफिस बंद, कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना

Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींना 20 मार्चला फासावर लटकवणार, नव्याने डेथ वॉरंट जारी

Web Title: ajit doval speaks about chhatrapati shivaji maharaj and his leadership qualities in police program rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.