उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना Whatsapp करेल, DGCA ने जारी केली SOP

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 09:39 PM2024-01-15T21:39:37+5:302024-01-15T21:40:30+5:30

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने विमान कंपन्यासांठी नवीन नियमावली जारी केली आहे.

Airlines will Whatsapp passengers in case of flight delay, DGCA issued SOP | उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना Whatsapp करेल, DGCA ने जारी केली SOP

उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना Whatsapp करेल, DGCA ने जारी केली SOP

नवी दिल्ली: नागरी विमान वाहतूक महासंचालनालय(DGCA) ने प्रवाशांच्या सोयीसाठी एअरलाइन्सना एक SOP जारी केला आहे. Indigo फ्लाइटमध्ये घडलेल्या घटनेनंतर डीजीसीएने एसओपी जारी करणार असल्याचे सांगितले होते. याअंतर्गत, विमान कंपन्यांना उड्डाणास विलंब होणार असल्यास किंवा प्रवाशांच्या  गैरसोयीबाबत जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

DGCA संचालक अमित गुप्ता यांनी जारी केलेल्या डीजीसीएच्या एसओपीनुसार, विमानाच्या उड्डाणाला उशीर होणार असल्यास, त्याचे कारण प्रवाशांना सांगणे गरजेचे आहे. यासाठी DGCA ने CAR जारी केली आहे. प्रवाशांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फ्लाइटच्या विलंबाची माहिती दिली जाईल.

या सूचना देण्यात आल्या...
1. एअरलाइन्सना त्यांच्या फ्लाइटच्या विलंबाबाबत अचूक रिअल-टाइम माहिती शेअर करावी लागेल. याद्वारे ती माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचेल.
अ) एअरलाइन वेबसाइट
ब) प्रवाशांना एसएमएस/व्हॉट्सअॅप आणि ई-मेलद्वारे माहिती.
क) विमानतळावर वाट पाहत असलेल्या प्रवाशांना फ्लाइटच्या विलंबाबाबत अद्ययावत माहिती.
ड) विमानतळावरील एअरलाइन कर्मचार्‍यांनी योग्यरित्या संवाद साधणे आणि उड्डाण विलंबाबाबत गंभीरपणे प्रवाशांना योग्य कारणे सांगणे महत्त्वाचे आहे.

विमान उड्डाणाला उशीर, प्रवासी संतापला अन् थेट पायलटवर केला हल्ला; VIDEO व्हायरल

धुके असल्यास उड्डाण रद्द होऊ शकते, परंतु...
धुक्याचा हंगाम किंवा प्रतिकूल हवामान लक्षात घेऊन विमान कंपन्या उड्डाणे अगोदरच रद्द करू शकतात. अशा परिस्थितीमुळे 3 तासांपेक्षा जास्त उशीर होणार असल्यास उड्डाण रद्द करता येईल, परंतु प्रवाशांना त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. सर्व विमान कंपन्यांना वरील SOP चे तात्काळ प्रभावाने पालन करण्यास सांगितले आहे. 

Web Title: Airlines will Whatsapp passengers in case of flight delay, DGCA issued SOP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.