'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 11:07 IST2025-07-05T11:07:39+5:302025-07-05T11:07:58+5:30
उड्डाण करण्यापूर्वी एअर इंडियाचा एक पायलट अचानक आजारी पडला. त्यानंतर पायलटला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले.

'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या मागे अडचणींचा ससेमिरा लागला आहे. अहमदाबाद अपघात, विमानातील तांत्रिक बिघाड अशा अनेक अडचणींचा सामना एअर इंडिया करत आहे. आता बंगळुरूहून दिल्लीला उड्डाण करण्यापूर्वी, एअर इंडियाचा एक पायलट अचानक आजारी पडला. त्यानंतर पायलटला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले आणि प्रवाशांना नेण्यासाठी एअरलाइनला दुसऱ्या पायलटची व्यवस्था करावी लागली. ४ जुलै रोजी सकाळी त्यांचा एक पायलट अचानक आजारी पडला असल्याची पुष्टी एअर इंडियाने केली.
एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले की, ४ जुलै रोजी सकाळी आमच्या एका वैमानिकाची अचानक तब्येत बिघडली. परिणामी, वैमानिक बेंगळुरू ते दिल्ली हे विमान एआय २४१४ चालवू शकले नाहीत आणि त्यांना ताबडतोब स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु, त्यांना त्याच रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, असे एअर इंडियाने म्हटले आहे.
एअर इंडियाच्या वैमानिकाची प्रकृती बिघडली!
शुक्रवारी सकाळी बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे कॅप्टन श्रीवास्तव अचानक विमानतळावर बेशुद्ध पडले. शुक्रवारी सकाळी बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या (BLR) 'एआय २४१४'च्या उड्डाणापूर्वी ही घटना घडली. एअर इंडियाच्या वैमानिकाला बंगळुरूमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पायलट रुग्णालयात दाखल
या घटनेबद्दल एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, '४ जुलै रोजी सकाळी आमच्या एका वैमानिकाला मेडिकल इमर्जन्सी झाली. त्यानंतर, वैमानिक बेंगळुरू ते दिल्ली हे 'एआय २४१४' विमान चालवू शकला नाही. त्याला ताबडतोब स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. सध्या, वैमानिकाची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.'
त्यांनी सांगितले की, पायलटची अचानक तब्येत बिघडल्यामुळे 'एआय २४१४'चे उड्डाण उशिरा झाले आणि आमच्या कॉकपिट क्रूमधील दुसऱ्या सदस्याने त्याची काळजी घेतली.