Air India Plane Fire: एअर इंडियाच्या विमानाला आग, प्रवाशांमध्ये गोंधळ; चेंगराचेंगरीत 14 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 16:12 IST2022-09-14T16:12:50+5:302022-09-14T16:12:57+5:30
Air India Plane Fire: एअर इंडियाचे विमान मस्कटवरुन कोचीनकडे येणार होते.

Air India Plane Fire: एअर इंडियाच्या विमानाला आग, प्रवाशांमध्ये गोंधळ; चेंगराचेंगरीत 14 जखमी
Air India: गेल्या काही महिन्यांमध्ये विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता एअर इंडियाच्याविमानालाआग लागल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. आगीमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीत काही प्रवासी जखमी झाले. ही घटना मस्कतच्या विमानतळावर झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसची फ्लाइट IX442, VTAXZ मस्कतहून कोचीनसाठी निघणार होती. मस्कत विमानतळावर उभ्या असलेल्या या एअर इंडियाच्या विमानातून अचानक धूर निघू लागल्याने गोंधळ उडाला. यानंतर विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
आग लागली तेव्हा विमानात 141 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. धुरामुळे विमानात गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीत 14 जण जखमी झाले आहेत. प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी स्लाइड्सचा वापर करण्यात आला. या प्रकरणाची माहिती देताना DGCA ने सांगितले की, सर्व प्रवासी सुखरुप आहेत आणि त्यांच्यासाठी रिलीफ फ्लाईटची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या घटनेची चौकशी सुरू आहे.